Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

Illegal Cattle Transport

पातूर पोलिसांची मोठी कारवाई : अवैध गोवंश वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल; 3 जनावरे व बोलेरो वाहन जप्त

पातूर पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.


पातूर पोलिसांची मोठी कारवाई  अवैध गोवंश वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल 3 जनावरे व बोलेरो वाहन जप्त

पातूर : पातूर पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत 3 गोवंश जनावरे आणि बोलेरो पिकअप वाहन असा एकूण 6 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कारवाईचा सविस्तर तपशील

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून बोलेरो पिकअप (क्र. MH-30-AB-2891) ची तपासणी करण्यात आली. त्यावेळी वाहनामध्ये 3 गोवंश जनावरे क्रूरतेने कोंबून अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ वाहनासह जनावरे ताब्यात घेऊन पुढील कारवाई केली.

या प्रकरणी शेख फय्याज शेख हय्यात (वय 30, रा. मुजावरपुरा, ता. पातूर, जि. अकोला) याच्याविरुद्ध तसेच वाहन मालक शेख वाजीद शेख राजिक (रा. मुजावरपुरा, ता. पातूर, जि. अकोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 325 तसेच प्राणी संरक्षण अधिनियम, 1960 मधील कलम 5, 5अ, 5ब, 9 व 11(1)(ल) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

  • बोलेरो पिकअप वाहन: अंदाजे ₹6,00,000
  • 3 गोवंश जनावरे: अंदाजे ₹70,000
  • एकूण मुद्देमाल: ₹6,70,000

ही कारवाई 'ऑपरेशन प्रहार' अंतर्गत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक लेव्हलकर आणि पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मेश्राम, पातूर पोलीस उपनिरीक्षक गोसावी, सहायक पोलीस कॉन्स्टेबल सांगळे (601), रोशन (2414), साई (2276) व नितीन (1313) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Related to this topic: