Breaking News
  • अमरावती जिल्ह्यातील आजपासून शाळा सकाळच्या सत्रात
  • मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाणीच पाणी
  • समृद्धी महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट, समृद्धी महामार्गावर काही वेळासाठी वाहतूक ठप्प
  • सिया गोयल हिचे तिच्या मैत्रीणसोबतचे चॅट व्हायरल
  • पुण्यातील कोंढवा परिसरात मोठी वाहतूक कोंडी
  • पुणे-सोलापूर महामार्गावर टेम्पोला आग
  • अंबरनाथ पूर्वेतील पार्किंगच्या ठेकेदारांचे ठेके रद्द!
  • शेतीत काम करणारी 'महिला' आता 'शेतकरी': आ. श्वेता महाले पाटील
  • E20: 'सरकारचे प्रयोग, जनतेची परीक्षा?'

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली भाजप बैठक

भाजपच्या बैठकीत रटाळ भाषणांमुळे काहींची वामकुक्षी

Hingoli BJP Meeting: भाजपतर्फे कार्यकर्ता संमेलन व जिल्हा आढावा बैठक, यामध्ये ज्येष्ठ नेते मंडळींनी रटाळ भाषण केल्याने  काही पदाधिकार्‍यांनी चक्क वामकुक्षी घेतली तर काही मोबाईलमध्ये एकमग्न


भाजपच्या बैठकीत रटाळ भाषणांमुळे काहींची वामकुक्षी

Hingoli BJP Meeting |

 

काहींचे लांबलचक भाषण झाल्याने पुढील बैठकांमध्ये भाषणे टाळण्याची संघटन मंत्र्यांनी दिली तंबी

हिंगोली (Hingoli BJP Meeting) : येथे भाजपतर्फे रविवारी कार्यकर्ता संमेलन व जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ज्येष्ठ नेते मंडळींनी रटाळ भाषण केल्याने  काही पदाधिकार्‍यांनी चक्क वामकुक्षी घेतली तर काही मोबाईलमध्ये एकमग्न होते.

५ जुलै रविवार रोजी हिंगोलीतील (Hingoli BJP Meeting) रामाकृष्णा लॉजमध्ये भाजपतर्फे कार्यकर्ता संमेलन व जिल्हा आढावा बैठक  घेण्यात आली. बैठकीस मुख्यमार्गदर्शक म्हणुन प्रदेश उपाध्यक्ष तथा हिंगोली जिल्हा प्रभारी संजय कौडगे यांच्यासह राज्यसभा खा. डॉ. रामराव वडकुते, आ. तान्हाजीराव मुटकुळे, जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा उज्वला तांभाळे यांच्यासह अनेक पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये काही नेते मंडळींनी लांबलचक भाषणे केल्याने बैठकीत उपस्थित असलेल्या काही पदाधिकार्‍यांनी चक्क वामकुक्षी घेतली तर काही पदाधिकारी मोबाईलमध्येच मग्न होते.

ऐरव्ही ४० ते ५० मिनीटामध्ये घेण्यात येणार्‍या बैठका ही मात्र रविवारी तब्बल दिड ते दोन तास चालली. त्यामुळे जिल्हा प्रभारी संजय कौडगे यांनी बैठकीमध्ये होणार्‍या लांबलचक भाषणामुळे नाराजी व्यक्त करून भविष्यामध्ये घेण्यात येणार्‍या बैठकांमध्ये नेते मंडळींनी भाषणे टाळण्याची तंबी दिली.  तसेच या बैठकीत लोकप्रतिनिधी व महत्वाच्या पदाधिकार्‍यांनी उपस्थिती दर्शविली नसल्याने कौडगे यांनी बोलताना बैठकांमध्ये कोणी असो वा नसो, जो पक्षासाठी तळमळीने काम करेल तोच या प्रवाहात कायम राहील अशा कानपिचक्या दिल्या. 

आगामी काळात राजकीय रणनिती पक्षाचे ध्येयधोरण आणि संघटनात्मक बळकटीकरणा बाबत भाजपतर्फे रविवारी कार्यकर्ता संमेलन व जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत बराचवेळ भाषण बाजी झाल्याने भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा हिंगोली जिल्हा प्रभारी संजय कौडगे यांनी नाराजी व्यक्त करून भविष्यात घेण्यात येणार्‍या बैठकामध्ये भाषण बाजी करू नये, अशी तंबी दिली. दरम्यान या रटाळ भाषणांमुळे काही पदाधिकार्‍यांनी वामकुक्षी घेतली.

Related to this topic: