Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा

लोकांमध्ये कायद्याचा आदर असावा, भिती नको: पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा

SP Dr. Shrenik Lodha: डॉ. श्रेणिक लोढा यांनी लोकांमध्ये कायद्यांचे पालन करण्यासाठी प्रेरित करावयाचे सांगितले. त्यांनी सायबर अपराध, आगामी तक्रार आणि मुलांना कायद्याची माहिती देण्याच्या समस्यावर सल्ला


लोकांमध्ये कायद्याचा आदर असावा भिती नको पोलिस अधिक्षक डॉ श्रेणिक लोढा

SP Dr. Shrenik Lodha |

हिंगोली (SP Dr. Shrenik Lodha) : लोकांमध्ये कायद्याचा आदर असला पाहीजे, कायद्याची भिती नसावी, यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून कायद्याचे पालन करावे असे आवाहन नुतन पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी पत्रकार भेटी दरम्यान केले. या प्रसंगी जिल्हाभरातून पत्रकार उपस्थित होते. (SP Dr. Shrenik Lodha)  डॉ. श्रेणिक लोढा हे २०१८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते मुळात डॉक्टर असुन पुण्यातील ससुन रुग्णालयात त्यांनी वैद्यकीय सेवा दिलेली आहे. आयपीएस झाल्यानंतर नक्सलग्रस्त भाग म्हणुन ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. बुलढाणा जिल्ह्यात अप्पर पोलिस अधिक्षक पदावर असताना त्यांनी कायदा व सुव्यवस्था प्रभावीपणे राबविली होती. तेथून त्यांची पोलिस अधिक्षक म्हणुन पहिली नियुक्ती हिंगोली जिल्ह्यात झाली आहे. 

बुधवारी जिल्हाभरातील पत्रकारांशी त्यांनी पोलिस मुख्यालयात संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्ह्यात कायदे पालनासाठी दंड संहितेचा व बळाचा वापर करण्या ऐवजी लोकांमध्ये स्वत:हून कायदा पाळण्याची वृत्ती बळावली पाहीजे अशी आशा व्यक्त केली. हल्ली सायबर गुन्हे खुप वाढले आहेत असल्याचे सांगुन अशा प्रकारांमध्ये १९३० या क्रमांकावर तक्रार करावी अशी सूचना केली. डिजीअल अरेस्टचा बनाव कोणी कराव असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा अशीही सूचना त्यांनी केली. अलिकडे १६ ते २० या वयोगटातील मुला मुलींनी टारगेट केले जात असल्याने या मुला मुलींना कायद्याची माहिती पालक व शिक्षकांनी द्यावी, यासाठी पत्रकार व सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही (SP Dr. Shrenik Lodha) डॉ. श्रेणिक लोढा यांनी केले. 

या प्रसंगी पत्रकारांच्या वतीने पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार तुकाराम झाडे, नंदकिशोर तोष्णीवाल, बसंतकुमार भट्ट, विजय दगडू, प्रद्युम्न गिरीकर, कन्हैया खंडेलवाल, दिलीप खोडके, अ‍ॅड. चंद्रकांत देवणे आदींसहीत जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.