Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली जिल्हा आरोग्य विभाग

पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा आरोग्य विभाग सज्ज

Hingoli Health Department: हिंगोली जिल्हा आरोग्य विभागाने शेगावच्या पालखीमार्गावर वेळेच्या मायक्रोप्लान तयार केलेली आहे. दिंड्यांना वैद्यकीय सहाय्य, औषध साठा, पिण्याचा पाण्याचा परीक्षण


पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा आरोग्य विभाग सज्ज

Hingoli Health Department |

 

दिंड्यांमधील वारकऱ्यांसाठी मायक्रो प्लॅनद्वारे चोख आरोग्य व्यवस्था

हिंगोली (Hingoli Health Department) : शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हिंगोली जिल्ह्यात दाखल होणार आहे. याशिवाय राज्यातील इतर जिल्ह्यांतूनही पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या शेकडो दिंड्या हिंगोली मार्गे मार्गक्रमण करतात. या सर्व भाविक- वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने विशेष मायक्रो प्लॅन तयार केला आहे. 

पालखी आणि दिंडी मार्गावरील प्रत्येक मुक्कामाच्या व विश्रांतीच्या ठिकाणी 24 तास वैद्यकीय सेवा उपलब्ध राहणार आहे. यासाठी फिरती वैद्यकीय पथके, प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील अतिरिक्त डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ताप, जुलाब, अतिसार, डीहायड्रेशन, स्नायूदुखी यासारख्या वारीदरम्यान वारंवार आढळणाऱ्या तक्रारींवर तात्काळ उपचारासाठी पुरेसा औषध साठा, ओआरएस पाकिटे, आयव्ही फ्लुइड्स व आपत्कालीन औषधे प्रत्येक पथकाकडे देण्यात आली आहेत.

मुक्कामस्थळी पिण्याच्या पाण्याची दररोज गुणवत्ता तपासणी, परिसरात स्वच्छता व आवश्यक तिथे औषध फवारणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. साथरोग नियंत्रणासाठी विशेष देखरेख पथके कार्यरत राहतील व दररोजची आरोग्यविषयक आकडेवारी जिल्हास्तरावर संकलित करून आढावा घेतला जाणार आहे. 108 सह इतर रुग्णवाहिका पालखी मार्गावर सज्ज ठेवण्यात आल्या असून गंभीर रुग्णांसाठी जवळच्या ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

आरोग्य विभागाने महसूल, पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय साधून वारकऱ्यांना अखंडित सेवा मिळेल याची दक्षता घेतली आहे. (Hingoli Health Department) हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्व दिंड्यांना आरोग्य सुविधा एकसमान मिळाव्यात यासाठी तालुकानिहाय नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. वारकऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, पुरेसे पाणी प्यावे, उघड्यावरील अन्न टाळावे, असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे.

श्रींच्या पालखी सोबतच इतर दिंड्यांमधील हजारो भाविकांचा प्रवास सुरक्षित व आरोग्यदायी व्हावा यासाठी आरोग्य विभागाची संपूर्ण यंत्रणा अहोरात्र कार्यरत राहणार असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने वैद्यकीय मदत दिली जाईल, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.


जुलैच्या पहिल्या आठवड्यात गजानन महाराज पालखी व पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंड्यांच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा आरोग्य विभागाने मायक्रो प्लॅन तयार केला आहे. पालखी मार्गावरील प्रत्येक मुक्कामस्थळी 24 तास वैद्यकीय पथके, फिरत्या रुग्णवाहिका, पुरेसा औषधसाठा व ओआरएस उपलब्ध राहणार आहे. पिण्याच्या पाण्याची तपासणी, स्वच्छता, औषध फवारणी व साथरोग नियंत्रणासाठी विशेष पथके तैनात. वारकऱ्यांच्या आरोग्यसेवेसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे.