Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली जिल्हा रुग्णालय

आयुक्त संजय काटकर यांच्याकडून हिंगोली जिल्हा रुग्णालयाची पाहणी

Hingoli District Hospit: रुग्णालयातील ओपीडी, आयपीडी, जनरल विभाग, एमआरआय विभाग, अती दक्षता नवजात बालक विभाग, प्रयोगशाळा, एक्स-रे विभाग, औषध साठा, प्रसूती कक्ष, माता-बाल संगोपन सुविधा, ऑपरेशन थिएटर आदी


आयुक्त संजय काटकर यांच्याकडून हिंगोली जिल्हा रुग्णालयाची पाहणी 

Hingoli District Hospital |

हिंगोली (Hingoli District Hospital) : राष्ट्रीय आरोग्य अभियान तथा संचालक, आरोग्य व कुटुंब कल्याण (मुंबई) यांचे आयुक्त संजय काटकर यांनी हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयास भेट देऊन  पाहणी केली. रुग्णालयातील ओपीडी, आयपीडी, जनरल विभाग, एमआरआय विभाग, अती दक्षता नवजात बालक विभाग, प्रयोगशाळा, एक्स-रे विभाग, औषध साठा, प्रसूती कक्ष, माता-बाल संगोपन सुविधा, ऑपरेशन थिएटर आदी विभागांची पाहणी करून आरोग्य सेवेचा सविस्तर आढावा घेतला. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून उपलब्ध आरोग्य सेवांबाबत माहिती घेतली असता नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

आयुक्त संजय काटकर यांनी आरोग्य विषयक समस्या जाणून घेतल्या त्या पूर्ण सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. (Hingoli District Hospital) जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम बनण्यास मदत होईल अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दिपक मोरे, बालरोग तज्ञ गोपाल कदम, डॉ. विशाल पवार आणि रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related to this topic: