Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > मराठवाडा

आमदार संतोष बांगर

आमदार संतोष बांगर यांच्याकडून शेकडो युवकांसह विठ्ठलाचे दर्शन

MLA Santosh Bangar: व्यापारी व जिमचे युवकही सहभागी ​हिंगोली कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोषराव बांगर यांनी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे जाऊन श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मनोभावे दर्शन


आमदार संतोष बांगर यांच्याकडून शेकडो युवकांसह विठ्ठलाचे दर्शन

MLA Santosh Bangar |


​पंढरपूरच्या वाटेवर; माऊलीच्या दिंडीत रंगले भजन आणि फुगडी

हिंगोली (MLA Santosh Bangar) : व्यापारी व जिमचे युवकही सहभागी ​हिंगोली कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोषराव बांगर यांनी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे जाऊन श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मनोभावे दर्शन घेतले. विशेष म्हणजे, यंदा आमदार बांगर यांनी हिंगोली शहरातील विविध जिममधील (व्यायामशाळा) शेकडो युवक, नवतरुण आणि स्थानिक व्यापाऱ्यांना सोबत घेऊन हे विठ्ठल दर्शन घडवून आणले.

​पंढरपूरला जात असताना रस्त्यामध्ये माऊलींच्या दिंड्यांचे दर्शन घेताना आमदार संतोष बांगर स्वतःला रोखू शकले नाहीत. विठ्ठल नामाच्या जयघोषात मग्न होऊन त्यांनी वारकऱ्यांसोबत मनसोक्त भजन केले, तसेच दिंडीमध्ये फुगडी खेळण्याचा आनंदही लुटला. त्यांच्या या भक्तीमय रूपाने उपस्थित वारकऱ्यांची मने जिंकून घेतली.

बांगर कुटुंबियांची पायी वारी
मागील ८ ते १० दिवसांपासून आमदार बांगर (MLA Santosh Bangar) यांचे मोठे बंधू तथा शिवसेना नगरसेवक गटनेते श्रीरामदादा बांगर आणि त्यांच्या पत्नी सौ. रेखाताई बांगर (नगराध्यक्ष, हिंगोली) या पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत.

प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या दर्शना दरम्यान आमदार बांगर यांच्यासोबत हिंगोली नगरपालिकेचे शिवसेना गटनेते श्रीराम बांगर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख राम कदम, तालुकाप्रमुख शेळके, शासकीय कंत्राटदार मयूर कयाल, बाळू गव्हाणे, सुमित चौधरी, पवन मुंदडा, गिरीश गुंडेवार, सोनी, विशाल व्यायामशाळेचे वस्ताद भरत चौधरी, पंकज सोनी, मुरली हेडा, संतोष बांगर, पवन खंडेलवाल, विशाल वर्मा, राजू बगडिया आणि अमित हेडा यांच्यासह हिंगोलीतील अनेक मान्यवर व तरुण उपस्थित होते. 'ज्ञानोबा-तुकाराम' आणि 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल'च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता

Related to this topic: