Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली पाणिपुरवठा

हिंगोलीत आदर्श महाविद्यालय जलकुंभावरून पाणीपुरवठ्याची हुलकावणी, नागरिक संतप्त

Hingoli Water Supply: हिंगोलीतील नागरिकांना मंगळवार पाणिपुरवठा होणार असले तरी तांत्रिक बाधेमुळे सायंकाळपर्यंत पाणी आल्याच्या अपयशी योजनेमुळे दिवसभर संताप झाला. नगरपालिका स्पष्टीकरण देत नाही.


हिंगोलीत आदर्श महाविद्यालय जलकुंभावरून पाणीपुरवठ्याची हुलकावणी नागरिक संतप्त

Hingoli Water Supply |

हिंगोली (Hingoli Water Supply) : शहरातील आदर्श महाविद्यालय जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गोविंद नगर, विवेकानंद नगर, सन्मती कॉलनी, हिल टॉप कॉलनी व परिसरातील नागरिकांना मंगळवार 16 जून रोजी सकाळी पाणीपुरवठा होणार होता. मात्र नगरपालिका पाणीपुरवठा विभागाने तांत्रिक बिघाडाचे कारण देत पाणी उशिरा सोडले जाईल असे सांगितले. प्रत्यक्षात दिवसभर नागरिकांनी वाट पाहूनही सायंकाळपर्यंत नळाला पाणी आले नाही.

या भागात शेवटचा पाणीपुरवठा 5 जून रोजी झाला होता. त्यानंतर तब्बल अकरा दिवस उलटून बाराव्या दिवशीही पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उन्हाळ्याचा शेवटचा टप्पा सुरू असतानाही पाणीपुरवठ्यात सुधारणा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

सततच्या हुलकावणीमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आता हिंगोली नगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. (Hingoli Water Supply) दरवेळी तांत्रिक कारण पुढे करून पाणीपुरवठा टाळला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला. पाणीपुरवठा नेमका कधी सुरळीत होणार याबाबत नगरपालिका प्रशासनाकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

Related to this topic: