Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

सिद्धेश्वर धरण पुरवठा

हिंगोलीकरां च्या पाण्याची प्रतीक्षा लांबली; सिद्धेश्वर धरणातून पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील वीज पुरवठा खंडित

Siddheshwar Dam Supply: सिदद्धेश्वर धरणापासून पुरवठा करत असलेल्या हिंगोलीलाकडून पाणी शुद्ध करणाऱ्या केंद्राचे वीज नाही, मग पाण्याचा पुरवठा ठप्प झाल्याने शहरात दुष्काळीचा परिणाम होतो.


हिंगोलीकरां च्या पाण्याची प्रतीक्षा लांबली सिद्धेश्वर धरणातून पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील वीज पुरवठा खंडित

Siddheshwar Dam Supply |

हिंगोली (Siddheshwar Dam Supply) : शहराचा पाणीपुरवठा पुन्हा एकदा विस्कळीत झाला आहे. शहराला सिद्धेश्वर धरणातून पाणीपुरवठा केला जातो आणि डिग्रस कराळे येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध केल्यानंतर शहरात वितरित केले जाते. मात्र सध्या या केंद्राचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. 

14 जून रोजी 33 केव्ही लाईनवर फिल्टरच्या पाठीमागे ट्रायल घेतली असता कट पॉईंटवर आवाज आल्याचे समोर आले. या ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत महावितरण चे अभियंता कामडी  यांना तातडीने फॉल्ट काढण्यासाठी कळवण्यात आले आहे. सध्या जलशुद्धीकरण केंद्रात वीज नसल्याने पाणी उपसा आणि शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. 

वीज विभागाकडून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून विद्युत पुरवठा पूर्ववत होताच (Siddheshwar Dam Supply) पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.