Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली आयशर ट्रक अपघात

आयशर ट्रकने कारला धडक देत २०० फूट फरफटत नेले; कारचे ८ लाखाचे नुकसान

Hingoli Truck-Car Accident:


आयशर ट्रकने कारला धडक देत २०० फूट फरफटत नेले कारचे ८ लाखाचे नुकसान

Hingoli Truck-Car Accident |

हिंगोली (Hingoli Truck-Car Accident) : वाशिम ते हिंगोली  राज्य महामार्गावर कारचालक  हिंगोली कडे  येत असताना भरधाव वेगातील आयशर ट्रकने कारला जोराची धडक दिली. व कार दीडशे ते दोनशे फूट फरफटत नेऊन गाडीचे मोठे नुकसान केले. झालेल्या अपघातात कारचालक बाल बाल बचावला आहे. याप्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात आयशर ट्रक चालकाविरुद्ध सचिन ओमप्रकाश साहू यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाशिम ते हिंगोली राज्य महामार्ग रस्त्यावर हजारो वाहने दररोज ये जा करत असतात २४ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास वाशिमहून हिंगोली कडे निघालेले कार अचानक सचिन साहू हे एम. एच. १४ डीएफ ०६०२  ने हिंगोली येथे येत असताना भरधाव  वेगातील आयशर ट्रकने जोराची धडक देत कार दीडशे ते दोनशे फूट फरपटत नेऊन ७  ते ८  लाख रुपयांचे नुकसान केले आहे.

तसेच हा (Hingoli Truck-Car Accident) अपघात वाशिम ते हिंगोली राज्य रस्त्यावर असलेल्या फाळेगाव फाट्याजवळ कृष्णा मंदिराच्या पाठीमागून कारला डाव्या बाजूस धडक दिल्याने कार फरपटत नेली. तसेच कारचालक बचावला आहे. आयशर ट्रक ओव्हरटेक करताना कारला जोराची धडक दिली. यात कारचे  ७ ते ८ लाख रुपयांचे नुकसान केले याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला आहे. आयशर ट्रक चालका विरुद्ध सचिन साहू यांच्या फिर्यादीवरून गुन्हा   दाखल करण्यात आला.