Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात 100 टक्के काम पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार

SIR Programme: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यात दि. 30 जून 2026 पासून विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्यक्ष मतदार पडताळणी मोहीम


विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात 100 टक्के काम पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार

SIR Programme |

हिंगोली (SIR Programme) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यात दि. 30 जून 2026 पासून विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्यक्ष मतदार पडताळणी मोहीम सुरू असून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घराघरात जाऊन मतदारांची पडताळणी करीत आहेत. या मोहिमेत संपूर्ण जिल्ह्यात 1,015 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कार्यरत असून त्यांना सहाय्य करण्यासाठी 37 सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या (SIR Programme) अभियानांतर्गत मतदारांना गणना प्रपत्रांचे वितरण, प्रपत्रे पूर्ण करून घेणे तसेच प्राप्त माहितीचे संगणकीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या सर्व कामांमध्ये 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विभागीय आयुक्त हे विभागातील मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या आढाव्यासाठी हिंगोली दौऱ्यावर आले होते.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चौंडेकर, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मंजुषा मुथा, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी राजेश सरवदे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सत्कार करण्यात आलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये एस. एस. कंदी, देवेंद्र डोल्हारे, रवी गायकवाड, एस. एन. नवले आणि देवानंद जावळे यांचा समावेश होता.

या सर्व अधिकाऱ्यांनी गणना प्रपत्रांचे 100 टक्के वितरण, 100 टक्के डिजिटायझेशन आणि विहित कालावधीत काम पूर्ण केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबवून मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्यासाठी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि संबंधित यंत्रणा समन्वयाने कार्यरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Related to this topic: