हिंगोली (Service Co-operative Society) : हिंगोली जिल्हा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था फेडरेशन च्या नवनिर्वाचित संचालकाच्या सभेत उमाशंकर माळोदे यांची निवडणुकी अंती जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर कैलास बंशीराम निकाळजे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित संचालक मंडळाचे स्वागत करण्यात आले.
दि २४/०७/२०२६ रोजी दुपारी सेवा सहकारी संस्था हिंगोली कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला . उपरोक्त बैठकीत संचालक गजानन खिल्लारी, नामदेव सपाटे, उमेश नागरे, भास्कर खोंडे,मधुकर दराडे,भागवत डव्हळे, चांदबा अवचार,अनिता टेमभरें, वंदना गाभणे, सामिरोद्दीन शेख, अब्दुल खान मनानं खान यांची उपस्तिती होती.

यावेळी (Service Co-operative Society) हिंगोली जिल्हा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था फेडरेशन च्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली सादर निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी २ व उपाध्यक्ष पदासाठी २ उमेदवारांनी अर्ज केला होता.
संचालकाच्या मतदान नंतर जिल्हा अध्यक्ष म्हणून उमाशंकर माळोदे यांची तर उपाध्यक्ष म्हणून कैलास बंशीराम निकाळजे यांची म्हणून निवड करण्यात झाल्याचे निवडणूक अधिकारी गुटटे यांनी जाहीर केले. यावेळी सर्व संचालक मंडळाचे शाल, हार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी अध्यक्ष उमाशंकर माळोदे व उपाध्यक्ष कैलास निकाळजे तसेच विजयी संचालकांचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी स्वागत केले.