Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली सह्याद्री हॉस्पिटल

हिंगोलीतील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये खूबा प्रत्यारोपण आणि गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

Hingoli Sahyadri Hospital: हिंगोलीतील सह्याद्री हॉस्पिटल ने पहिल्यांदा कृत्रिम सांधे आणि गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिय्या यशस्वी केले. दोन्ही रुग्ण मुख्यमंत्री सहायता निधीद्वारे उपचारासाठी वंचित


हिंगोलीतील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये खूबा प्रत्यारोपण आणि गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

Hingoli Sahyadri Hospital |

हिंगोली (Hingoli Sahyadri Hospital) : मुख्यमंत्री सहायता निधी द्वारे प्रथमच सह्याद्री हॉस्पिटल हिंगोली येथे खूबा प्रत्यारोपण आणि गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली असून रुग्णांना डिस्चार्ज करण्यात आला. आता कृत्रिम सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आपल्या सह्याद्री हॉस्पीटल हिंगोली येथे शक्य झाली असून रुग्णांना मोठ्या शहरात जाण्याची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री सहायता निधी द्वारे रुग्णांना आर्थिक सहाय्य मिळते आणि रुग्णांचा आर्थिक बोझा कमी होतो.

शस्त्रक्रियेनंतर दोन्ही रुग्ण समाधानी आहेत. रुग्ण रियाज शेख वय 35 वर्ष यांना AVN हिप चा त्रास होता त्यांची हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली. गोदावरी सावळे वय 45 वर्ष गुडघेदुखीने 10 वर्षापासून त्रस्त होती तिचे गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आले.

मुंबई येथे सांधा प्रत्यारोपण व आधुनिक शस्त्रक्रियेचा प्रदीघ्र अनुभव घेऊन डॉ. अरुण काळे - अस्थिरोग व सांधा प्रत्यारोपण तज्ञ आता सह्याद्री हॉस्पीटल हिंगोली येथे पूर्णवेळ उपलब्ध झाले असून ह्यांनी या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडल्या. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. अरुण काळे, डॉ. यशवंत पवार सर, डॉ. स्वाती पवार, भूलतज्ज्ञ डॉ. अमोल धुळधुळे, डॉ. शीतल काळे  ,dnyaneshwar जगताप, गंगाप्रसाद पाईकराव, वैभव गडगीळ, सोनाली सिस्टर यांनी सहाय्य केले. गुडघेदुखी आणि AVN हिप च्या रुग्णांनी मुख्यमंत्री सहायता निधी योजनेचा लाभ घ्यावा अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटल हिंगोली चे संचालक डॉ यशवंत पवार  यांनी हिंगोली जिल्ह्यातील गरजू रुग्णांना दिली.

Related to this topic: