Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली वीज वितरण

हिंगोली शहरातील कोलमडलेली वीज वितरण व्यवस्था लवकरच सुरळीत केली जाणार

Hingoli Electricity Distribution: आ. तान्हाजी मुटकुळे यांनी घेत ते आजारी असल्याने त्यांना  शिवाजीराव मुटकुळे यांना अभियंत्यांची भेट घेऊन समस्या सोडविण्यास सांगावे असे सांगितले होते.


हिंगोली शहरातील कोलमडलेली वीज वितरण व्यवस्था लवकरच सुरळीत केली जाणार

Hingoli Electricity Distribution |

 

दखल दैनिक देशोन्नतीची 
विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता चव्हाण यांचे भाजयुमो जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे यांना आश्वासन

हिंगोली (Hingoli Electricity Distribution) : शहरातील वीज वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. २० जुन रोजी शहरातील ८ नागरी वस्त्या १२ तास अंधारात होत्या या बाबत नागरिकांनी अभियंत्याला जाब विचारला या बाबत देशोन्नती मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची दखल आ. तान्हाजी मुटकुळे यांनी घेत ते आजारी असल्याने त्यांना  शिवाजीराव मुटकुळे यांना अभियंत्यांची भेट घेऊन समस्या सोडविण्यास सांगावे असे सांगितले होते. त्यामुळे शिवाजीराव मुटकुळे यांनी २२ जुन रोजी त्यांची भेट घेतली यावेळी त्यांनी लवकरच समस्या सोडविणार असल्याचे सांगितले.

हिंगोली शहरात मागील काही दिवसांपासून विजेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत शहरात सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामा दरम्यान २० जुन रोजी जेसीबीने भुमीगत केबल तोडल्यामुळे हिंगोलीतील शहरातील ८ वस्त्या १२ तास अंधारात होत्या या बाबत नागरिकांनी अभियंत्याला जाब विचारला होता. या बाबत २१ जुन रोजी सविस्तर वृत प्रसारित झाले होते त्यांची दखल आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी घेतली ते आजारी असल्याने त्यांनी चिरंजीव शिवाजीराव मुटकुळे यांना वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्या सोडविण्यासाठी सांगितले होते.

दरम्यान, शिवाजीराव मुटकुळे यांनी सोमवारी विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी मुटकुळे यांच्यासह नगरसेवक हमीदभाई प्यारेवाले, उमेश गुट्टे, राजेश गोटे, राजू यादव, बाबाराव घुगे, शहराध्यक्ष रजनीश पुरोहित, तसेच वीज वितरण विभागातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुटकुळे म्हणाले, गेल्या महिनाभरापासून शहरात दररोज नागरीज पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे वादळी वाऱ्यात तर वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे कमी दाबाने पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत या बाबत तक्रार वाढल्या आहेत.

मुटकुळे यांनी (Hingoli Electricity Distribution) अधिकारी चव्हाण यांना शहरातील ३० वर्षांपेक्षा जुन्या वीजवाहिन्या, गंजलेले खांब व ओव्हरलोड झालेले रोहित्र तातडीने बदलण्याची मागणी केली. अनेक ठिकाणी तारा लोंबकळत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात जीवितहानीचा धोका आहे. नवीन डीपी बसवून रोहित्रांची क्षमता वाढवावी. तक्रार निवारणासाठी स्वतंत्र पथक व हेल्पलाईन २४ तास कार्यान्वित करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. अभियंता चव्हाण यांनी सांगितले की, शहरातील समस्या लवकरच सोडविल्या जातील यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले नागरिकांनी अभितसेच शहरातील काही भागात विज तारेत येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्यात येणार आहेत तसेच विजेचा लोड वाढला आहे त्यामुळे काही भागात नवीन डीपी बसविण्यात येणार आहेत वितरण कंपनीकडे असलेल्या शासनाच्या योजनेतून ही कामे केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले विविध कामामुळे कामे मागे पडली होती ती आता हाती घेऊन लवकरच पूर्ण केली जातील असे त्यांनी सांगितले तसेच शहरातील सिध्दार्थ नगर भागात विजेच्या तारेत येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचे सांगितले.

दैनिक देशोन्नतीच्या वृत्ताची दखल
शहरात २० जून रोजी ८ नागरी वस्त्या बारा तास अंधारात होत्या. या बाबत संतप्त नागरीकांनी अभियंत्याला या बाबत जाब विचारला. या बाबत दैनिक देशोन्नतीमध्ये २१ जून रोजी सविस्तर वृत्त प्रसिध्द झाले होते. त्याची दखल आ. तान्हाजी मुटकुळे यांनी घेत आजारी असताना शिवाजीराव मुटकुळे यांना अभियंत्यांची भेट घेऊन समस्या सोडविण्याबाबत सांगितले होते. त्यानुसार शिवाजीराव मुटकुळे यांनी अभियंता चव्हाण यांची भेट घेवून समस्या संदर्भात चर्चा केली. यावेळी त्यांनी शहरातील सर्व समस्या लवकरच सोडविण्यात येतील. वितरण कंपनीकडे असलेल्या योजनेतून हि कामे हाती घेतले जाणार आहेत असे सांगितले.

Related to this topic: