Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली वाळू तस्करी

हिंगोलीत वाळू तस्करांवर पोलिसांची धडक कारवाई; 10 लाखांचा टिपर जप्त, दोघे ताब्यात

Hingoli Sand Smuggling: हिंगोलीत शहरातील वाळूच्या बेकायदेशीर चोरटीची गुंतागिरी पोलिसांनी खापरले. एक टिपरमध्ये १० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपियांना ताब्यात घेतला.


हिंगोलीत वाळू तस्करांवर पोलिसांची धडक कारवाई 10 लाखांचा टिपर जप्त दोघे ताब्यात

Hingoli Sand Smuggling |

हिंगोली (Hingoli Sand Smuggling) : हिंगोली शहरात वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पहाटे साडेपाच वाजता पोलिसांनी सापळा रचून एक पांढऱ्या रंगाचा टिपर पकडला. या टिपरमध्ये विनापरवाना पाच ब्रास वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी 10 लाख रुपये किमतीचा टिपर व 25 हजार रुपये किमतीची वाळू असा एकूण 10 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या (Hingoli Sand Smuggling) प्रकरणात पोलिस शिपाई गणेश देवराव लेकुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 जून रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रोडवरून टिपर क्रमांक MH 28 BE 3535 हा वाळू घेऊन जात असताना पोलिसांना मिळाला. आरोपी गोपाळ साहेबराव राठोड , रा. ब्राम्हणवाडा, ता. औंढा आणि कपील रामराव शेवाळे , रा. गंगानगर, हिंगोली या दोघांनी गजानन प्रल्हाद मोरे, रा. माळीपुरा, लोणार, जि. बुलढाणा याच्या सांगण्यावरून आर्थिक फायद्यासाठी ही वाळू विक्रीसाठी घेऊन जात होते. 

या (Hingoli Sand Smuggling) प्रकरणी आरोपींविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास ग्रेड पोउपनि काळे हे करीत आहेत. ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा,अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदन कुमार वाघमारे  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार मोहसीन शेख, दिलीप लेकुळे, आकाश बोथीकर व गणेश लेकुळे यांच्या पथकाने  केली आहे.

Related to this topic: