Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

पंतप्रधान आवास योजना

हिंगोलीत पंतप्रधान आवास योजनेची पहिली यादी जाहीर; 84 हजार 293 लाभार्थ्यांना मिळणार घरकुलाचा लाभ

PM Awas Yojana: प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2026 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली.


हिंगोलीत पंतप्रधान आवास योजनेची पहिली यादी जाहीर 84 हजार 293 लाभार्थ्यांना मिळणार घरकुलाचा लाभ

PM Awas Yojana |

हिंगोली (PM Awas Yojana) : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2026 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व 5 तालुक्यांतील एकूण 672 गावांतील 84 हजार 293 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, योजनेचा लाभ वेळेत मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यासाठी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ई-केवायसी पूर्ण करावी. यासोबतच बँक खात्याचे आधार प्रमाणीकरण करणेही आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांनी तातडीने आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या जिल्ह्यातील एकूण 84 हजार 293 पात्र लाभार्थ्यांपैकी केवळ 4 हजार 958 लाभार्थ्यांनीच ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित 80 हजार 45 लाभार्थी अजूनही या प्रक्रियेपासून वंचित आहेत. त्यामुळे उर्वरित सर्व लाभार्थ्यांनी विलंब न करता जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ई-केवायसी आणि आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आधार प्रमाणीकरण आणि इतर कागदपत्रे वेळेत पूर्ण न केल्यास लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Related to this topic: