Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली खून प्रकरण

हिंगोलीतील खून प्रकरणात फरार आरोपींना तात्काळ अटक करणार

Hingoli Murder Case: गोलीत पाच महिन्यांपूर्वी झालेल्या सय्यद कलिम सय्यद सलिम यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक केली जाईल, असे आश्वासन


हिंगोलीतील खून प्रकरणात फरार आरोपींना तात्काळ अटक करणार

Hingoli Murder Case |

 

विशेष पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचे मयताच्या नातेवाईकांना आश्वासन

हिंगोली (Hingoli Murder Case) : हिंगोलीत पाच महिन्यांपूर्वी झालेल्या सय्यद कलिम सय्यद सलिम यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक केली जाईल, असे आश्वासन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी मयताच्या नातेवाईकांना दिले. हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात 29 जूनला झालेल्या तक्रार निवारण दिनामध्ये मयताच्या कुटुंबीयांनी उमाप यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. 

७ फेब्रुवारी २०२६ रोजी सय्यद कलिम सय्यद सलिम यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी हिंगोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. ०६६/२०२६ दाखल आहे. कैफ मोहम्मद युनुस कुरेशी व सिराज मोहम्मद कुरेशी अशी मुख्य आरोपींची नावे असून गुन्हा दाखल होऊन पाच महिने उलटले तरी दोन्ही आरोपी फरार आहेत. 

मयताची पत्नी सय्यद समिना, भाऊ सय्यद वसिम, वडील सय्यद सलिम व आई सय्यद गौसीया यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पोलीस अधीक्षक व जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कारवाई झाली नाही. त्यामुळे नाइलाजाने ८ जून २०२६ रोजी कुटुंबाने लहान मुलांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यावेळी हिंगोली शहर पोलिसांनी १५ ते २० दिवसांत अटक करू असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र आजपर्यंत मुख्य आरोपींना अटक न झाल्याने कुटुंबाला पुन्हा उपोषण करावे लागेल अशी भीती वाटत आहे. 

निवेदन स्वीकारल्यानंतर विशेष पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सदर प्रकरणी फरार असलेल्या दोन्ही आरोपींना तात्काळ अटक केली जाईल असे स्पष्ट आश्वासन मयताच्या नातेवाईकांना दिले. (Hingoli Murder Case) आरोपींना लवकरात लवकर अटक करून न्याय मिळवून द्यावा, अशी विनवणी कुटुंबीयांनी केली आहे. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्पित लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, हिंगोली शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्रसिंह ठाकूर यांची उपस्थिती होती.

Related to this topic: