Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली विकासकाम

हिंगोलीतील प्रभाग क्रमांक 16 मध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन

Hingoli Development Work: नगराध्यक्ष गटनेते श्रीराम बांगर यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक १६ चे  नगरसेवक श्यामभाऊ कदम यांच्या हस्ते योशोदा नगर परिसरात विविध विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात संपन्न


हिंगोलीतील प्रभाग क्रमांक 16 मध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन

Hingoli Development Work |

हिंगोली () : नगराध्यक्ष गटनेते श्रीराम बांगर यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक १६ चे  नगरसेवक श्यामभाऊ कदम यांच्या हस्ते योशोदा नगर परिसरात विविध विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात संपन्न झाले. यामध्ये रस्ते व इतर मूलभूत सुविधांच्या कामांचा शुभारंभकरण्यात आला.

यावेळी नगरसेवक श्यामभाऊ कदम यांनी नागरिकांना दिलेला शब्द पाळत पावसाळ्यापूर्वी यशोदा नगर येथील रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले. परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांवर प्राधान्याने लक्ष देत विकास कामांना गती देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 'जनतेने दाखविलेल्या

विश्वासाला न्याय देत प्रभागातील प्रत्येक (Hingoli Development Work) विकासकाम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्यात येईल,' असे प्रतिपादन श्यामभाऊ कदम यांनी केले. भूमिपूजन प्रसंगी स्थानिक नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी या विकासकामांचे स्वागत करत नगरसेवक श्यामभाऊ कदम यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी प्रभाग क्रमांक १६ च्या विकासासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही नगरसेवक श्याम कदम यांनी दिली.