Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेस

दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्याच्या आरोपावरून हिंगोलीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसर्‍या नगरसेवकाचे पद धोक्यात

Hingoli Nationalist Congress Party: हिंगोलीतील काँग्रेसच्या नगरसेवक हाशमी सय्यद बासित यांना महासंचालनातून पद धोक्यात आले आहे. त्यांचे २००१ नंतर जन्मलेल्या दोन जास्त अपत्य असल्याचा आरोप


दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्याच्या आरोपावरून हिंगोलीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसर्‍या नगरसेवकाचे पद धोक्यात

Hingoli Nationalist Congress Party |

 
जिल्हाधिकार्‍यांकडे अपात्रतेची याचिका दाखल

हिंगोली (Hingoli Nationalist Congress Party) : हिंगोली नगर परिषदेतील प्रभाग क्र. १४ ब चे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक हाशमी सय्यद बासित यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम ४४ अन्वये दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्याने त्यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी करणारी याचिका जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली आहे. 

व्यवसायाने व्यापारी असलेले व प्रभाग क्र. ७ चे मतदार शेख नईम शेख लाल यांनी २४ जून २०२६ रोजी ही याचिका दाखल केली. याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, २२ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीत हाशमी सय्यद बासित हे प्रभाग क्र. १४ ब मधून निवडून आले. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सादर केलेल्या शपथपत्रात दोनच अपत्ये असल्याचे नमूद केले होते. शपथपत्रानुसार, १२ सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेली त्यांची दोन अपत्ये आहेत. त्यात तझीन फातेमा, जन्म दिनांक ७ मार्च २००४ हिचा उल्लेख आहे. मात्र याचिकाकर्त्याने दावा केला आहे की प्रत्यक्षात नगरसेवक बासित यांना दोनपेक्षा जास्त अपत्ये आहेत. त्यांनी शपथपत्रात खोटी माहिती देऊन निवडणूक लढवली व जनतेची दिशाभूल केली.  

या तरतुदीचा आधार घेत याचिकाकर्त्याने बासित यांचे पद तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे हिंगोलीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रभाग क्र. १४ ब मधील नागरिकांमध्येही याबत चर्चा सुरू आहे. जिल्हाधिकारी या प्रकरणात दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून पुराव्यांची पडताळणी करणार आहेत. याचिकेवर सुनावणी घेऊन लवकरच निर्णय अपेक्षित आहे. जिल्हाधिकारी काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी राकाँच्या एका सदस्य महिलेचे सदस्यत्व रद्द
हिंगोली नगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका रुबीना मोहम्मद यांना तिसरे अपत्य झाल्याने अपात्र ठरवण्यात आले आहे. महाराष्ट्र नगर पालिका कायद्यानुसार २००१ नंतर जन्मलेले दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्यास सदस्यत्व रद्द होते. जिल्हाधिकार्‍यांनी या कायद्याचा आधार घेत रुबीना मोहम्मद यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय दिला.  दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांच्या या निर्णया विरोधात त्यांना पुढील योग्य न्यायालयात अपील करण्याची संधी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे हिंगोली पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सदस्य कमी झाला आहे.