Hingoli Maharajswa Abhiyan: हिंगोली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान आणि मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले
हिंगोली (Hingoli Maharajswa Abhiyan) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महसुलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या संकल्पनेतुन महसूल विभागाच्या वतीने फाळेगाव येथे हिंगोली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान आणि मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या (Hingoli Maharajswa Abhiyan) शिबिराच्या अध्यक्षस्थानी हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तान्हाजीराव मुटकूळे हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकूडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, तहसिलदार सखाराम मांडवगडे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे, बिडीओ माया वानखेडे, के.के शिंदे, सरपंच लक्षमीबाई असोले, फुलाजीराव शिंदे, नारायण खेडकर, जिल्हा प्रवक्ता विलास गोरे, रजनीश पुरोहीत, माणीक लोडे, शंकरराव बोरुडे, विष्णू भोजे, अय्युब पठाण, माजी सभापती उत्तमराव असोले, पोलीस पाटील कवीताताई बेले ताई, श्रीरंग राठोड, नंदूभाऊ खिल्लारे, पदमाकर नायक, सचिन शिंदे, काळे तलाठी यांच्यासह महसूल व आरोग्य विभागाचे विविध अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि महत्त्वाच्या दाखल्यांसाठी अनेकदा शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. हीच अडचण ओळखून प्रशासनाने या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना लागणारे विविध महसूल दाखले, दाखल्यांचे नूतनीकरण आणि शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचे प्रमाणपत्र वाटप थेट एकाच छताखाली अत्यंत पारदर्शकपणे केले थेट गावातच सर्व कागदपत्रे वाटप करण्यात आले.
या (Hingoli Maharajswa Abhiyan) अभियानांतर्गत केवळ शासकीय कागदपत्रेच नव्हे, तर नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नेत्र तज्ज्ञ डॉक्टर किशन लखमावार, डॉ. संजय नाकाडे, डॉ. दिपक मोरे, डॉ. मनिष बगडिया यांच्यासह दंत महाविद्यालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार तान्हाजीराव मुटकूळे म्हणाले की, सर्वसामान्यांच्या दारात शासकीय सेवा पोहोचवणे हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जनतेला ही हक्काची भेट देण्यात आली आहे. शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास त्यांनी यावेळी त्यांनी व्यक्त केला.