Hingoli Solar Order: हिंगोलीच्या जिल्हा परिषदात मुख्य कार्यकारी Vivek Gayakwad यांच्या अड्क्सतखाली आयोजित निदेश समन्वय समितीचे बैठक झाले. सॉलार बसविणी, घरकुल योजना
समन्वय समितीच्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून सर्व विभागाचा आढावा
हिंगोली (Hingoli Solar Order) : जिल्हा परिषद हिंगोली येथील सभागृहामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज समन्वय समितीची बैठक पार पडली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) समृद्धी दिवाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गडापोड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) विजय बोराटे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, शिक्षणाधिकारी (योजना) संदीप सोनटक्के, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अशावरी काळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) विपुन भागवत, कृषी अधिकारी अतुल वायसे, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रियंका राजपूत, कार्यकारी अभियंता राजू नरवाडे यांच्या सह विविध विभागाचे अधिकारी गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रामुख्याने घरकुल योजना चा आढावा घेण्यात आला राज्य पुरस्कार आवास योजना यामध्ये शबरी व रमाई योजना याचा आढावा घेण्यात आला. घरकुलाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. माझं गाव आरोग्य संपन्न गाव समिती स्थापनेचा आणि मेळावे व घेण्यात आलेले आरोग्य शिबिर यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
शाळा नुकत्याच सुरू झाल्या त्यांच्या प्रवेश उत्सव उपक्रमचा आढावा घेण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तक 100% वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या . स्थानिक निधी लेखा प्रकरण व परिच्छेद यांचे काम एक महिन्यांमध्ये शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी सर्व विभाग प्रमुखांना देण्यात आले. यासाठी शनिवार व रविवारी विशेष कॅम्प लावून लेखा परिच्छेद पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. (Hingoli Solar Order) विभागाकडे प्रलंबित असलेल्या अग्रिमाचा पंचायत समिती सेनगाव व पंचायत समिती औंढा यांना निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. एकल महिला सर्वेक्षणाचा आढावा घेण्यात आला, पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना यांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये सुरू असलेल्या विहिरी व सरू नसलेल्या विहिरी आणि बांधकाम पूर्ण झालेल्या विहिरी यांचाआढावा घेण्यात आला डबल लाभ दिल्या गेल्याचे आढळून आल्यास कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
शासकीय यंत्रणेला विज बिल झिरो येण्यासाठी सर्व ग्रामपंचायत, अंगणवाडी शाळा, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र सर्व शासकीय इमारतीवर सोलार बसविण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे सीईओ विवेक गायकवाड यांनी निर्देश दिले. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी खताचा साठा सुरक्षित ठेवणे आणि बोगस बियाण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या कुठल्याही तक्रारी आल्या नाही पाहिजेत त्याचबरोबर हर घर जल योजना, न्यू स्कीम यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बांधकाम पूर्ण झालेल्या कामकाजाच्या प्रगतीचा आणि पर्यटन विकास कार्यक्रमचा आढावा घेण्यात आला. त्याच त्याचबरोबर प्रत्येक विभागात चालू असलेल्या बांधकामाची स्थिती बाबत आढावा घेण्यात आला. पावसाळ्याच्या पूर्वी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले होते तरी ते काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पशुसंवर्धन विभागाच्या देण्यात येणाऱ्या सेवांचा आढावा घेण्यात आला. यात जनावरांचे लसीकरण व उपचाराचे काम वाढविण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात, खळ्यावर जाऊन जनावरांची तपासणी करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले. लघु पाटबंधारे पाझर तलाव l, सिंचन तलाव व नालाखोलीकरण या कामाचा सखोल आढावा घेण्यात आला. पावसाळ्यात काढून टाकलेला गाळ वाहून जाणार नाही. याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच बांधकाम तपासणीचे अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. सर्व विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.