Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

अवैध गुटखा बंदी

‘मुंढे पर्व' सुरू होताच हिंगोलीत खळबळ पान टपर्‍या बंद; अवैध गुटख्याची विक्री ठप्प

Illegal Gutkha Banned: अन्न व औषध प्रशासनाचा आयुक्त तुकाराम मुंढे यांची नोंदणीपासून हिंगोलीत अवैध गुटखा विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाई सुरू झाली. फेडिओ एफडीएच कारकुंबत पान टपर्यांच्या दुकाने बंद


‘मुंढे पर्व सुरू होताच हिंगोलीत खळबळ पान टपर्‍या बंद अवैध गुटख्याची विक्री ठप्प

Illegal Gutkha Banned |

हिंगोली (Illegal Gutkha Banned) : अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यापासून राज्यभरात अवैध अन्नपदार्थ आणि गुटखा विक्रीविरोधात कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. मुंढे यांनी पदभार स्वीकारताच ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले असून, त्याचे थेट परिणाम आता जिल्हा पातळीवर दिसू लागले आहेत. हिंगोली शहरात एफडीएच्या धडक कारवाईच्या धास्तीने अनेक पान टपरीचालकांनी आपली दुकाने अधूनमधून बंद ठेवण्यास सुरुवात केली आहे.

हिंगोलीत यापूर्वी पान टपर्‍यांवर सर्रास अवैध गुटखा, सुगंधित तंबाखू (Illegal Gutkha Banned) आणि पान मसाल्याची खुलेआम विक्री होत होती. मात्र मुंढे आयुक्त झाल्यानंतर एफडीएच्या पथकांनी जिल्ह्यात अचानक छापे टाकण्यास सुरुवात केली. कुठेही पूर्वसूचना न देता होणार्‍या या कारवायांमुळे विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक टपरीचालकांनी खबरदारी म्हणून दुकाने बंद ठेवणे पसंत केले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसर आणि शाळा-महाविद्यालयांजवळील टपर्‍यांवर शुकशुकाट दिसत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, गेल्या काही दिवसांपासून गुटखा मागितल्यावर ‘साठा नाही’ किंवा ‘माल येत नाही’ अशी उत्तरे मिळत आहेत. यापूर्वी सहज उपलब्ध होणारा प्रतिबंधित गुटखा आता मिळेनासा झाला आहे. एफडीएच्या अधिकार्‍यांनीही याला दुजोरा दिला असून, जिल्ह्यात सलग मोहीम राबवली जात असल्याचे सांगितले. दुकानांवर छापे, माल जप्ती आणि परवाना रद्द करण्यापर्यंतची कारवाई केली जात असल्याने अवैध धंद्यांवर अंकुश बसत आहे.

तुकाराम मुंढे यांच्या कामाची पद्धत ‘कडक शिस्त आणि तात्काळ कारवाई’ अशी ओळखली जाते. त्यांच्या नियुक्तीनंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांत भेसळयुक्त अन्नपदार्थ, मुदतबाह्य औषधे आणि गुटख्याविरोधात मोहिमा तीव्र झाल्या आहेत. हिंगोलीतील चित्र हे त्याचेच एक उदाहरण मानले जात आहे. प्रशासनाच्या या धडक भूमिकेमुळे सामान्य नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे, तर अवैध व्यावसायिकांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

दरम्यान, एफडीएने स्पष्ट केले आहे की ही कारवाई केवळ तात्पुरती नसून, सातत्याने सुरू राहणार आहे. शाळा- महाविद्यालय परिसरातील १०० मीटर अंतरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार्‍यांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. मुंढे यांच्या आक्रमक कार्यपद्धतीमुळे येत्या काळात राज्यभर अवैध गुटखा विक्रीला मोठा आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तरूण पिढी गुटख्याच्या आहारी
शासनाने प्रतिबंधीत करण्यात आलेला गुटखा जिल्ह्यात सर्रास विक्री होत होती. यामुळे तरूण पिढी गुटख्याच्या (Illegal Gutkha Banned) आहारी गेली आहे. आता गुटखा विक्री विरोधात कडक कारवाई केली जात असल्याने गुटखा विक्रेत्यावर वचक निर्माण झाला आहे.

Related to this topic: