Hingoli Gutkha Seized: हिंगोलीतील पोलीसाने ३५,००० रुपयेंच्या प्रतिबंधित गुटखेबरोबर ७०,००० रुपयांचा वाहन खर्चाची इलेक्ट्रिक सायकल जप्त केली. एक आरोपी मोहम्मद समीर अब्दुल सत्तार याला अटक
हिंगोली (Hingoli Gutkha Seized) : शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा वाहतुकीचा 28 जूनला पर्दाफाश केला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. श्रेणीक लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदन कुमार वाघमारे व शहर पोलिस निरीक्षक गजेंद्रसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांच्या पथकाने ही कारवाई केली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय मार्के, अशोक धामणे, गणेश लेकुळे, मोहसीन शेख व संदीप सोनटक्के यांच्या पथकाने छापा टाकून 35 हजार 60 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली 70 हजार रुपयाची इलेक्ट्रिक मोटारसायकल असा एकूण 1,05,060 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या (Hingoli Gutkha Seized) प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आझम कॉलनी, हिंगोली येथील रहिवासी मोहम्मद समीर अब्दुल सत्तार याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीच्या अटकेची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.