Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल व एलपीजीचा पुरेसा साठा, अफवांवर विश्वास ठेवू नका: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे आवाहन

Collector Rahul Gupta: हिंगोली जिल्ह्यात इंधन (पेट्रोल, डिझेल) आणि घरगुती गॅस (एलपीजी)चा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जिल्हा प्रशासनाने अफवांबद्दल नागरिकांना चेतावणी दिली.


हिंगोली जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल व एलपीजीचा पुरेसा साठा अफवांवर विश्वास ठेवू नका जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे आवाहन

Collector Rahul Gupta |

हिंगोली (Collector Rahul Gupta) : जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या तुटवड्याबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार 26 मे 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व पंप व वितरकांकडे इंधनाचा व गॅसचा मुबलक साठा उपलब्ध आहे. 

जिल्ह्यात सध्या एकूण 81 पेट्रोल पंपांवर 297.6 किलोलीटर पेट्रोल व 273.3 किलोलीटर डिझेलचा साठा शिल्लक आहे. त्याचबरोबर 75 किलोलीटर पेट्रोल व 144 किलोलीटर डिझेलचे टँकर मार्गावर असून ते लवकरच पंपांवर पोहोचणार आहेत. घरगुती एलपीजीबाबतही परिस्थिती नियंत्रणात आहे. 13 वितरकांकडे 4236 सिलिंडरचा ओपनिंग स्टॉक असून 26 मे रोजी 2606 सिलिंडरचे वितरण करण्यात आले. उद्यासाठी 3731 सिलिंडरची मागणी नोंदवण्यात आली असून 355 व्यावसायिक सिलिंडरही उपलब्ध आहेत. 

उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे ग्राहकांच्या सोयीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व पेट्रोल पंपधारकांना तातडीचे आदेश दिले आहेत. प्रत्येक पंपावर ग्राहकांसाठी स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छ प्रसाधनगृहे, फर्स्ट एड किट, कार्यरत हवा भरण्याचे यंत्र व अग्निशमन यंत्रे बंधनकारक करण्यात आली आहेत. तसेच पंपावर तक्रार पुस्तिका व हेल्पलाईन क्रमांक दर्शनी भागात लावणे अनिवार्य आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कॅन, बाटली किंवा इतर खुल्या भांड्यात पेट्रोल-डिझेल देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पंपधारकांवर पेट्रोलियम अ‍ॅक्ट 1934 व नियम 2002 अंतर्गत कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. 

याशिवाय, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या 22 मे 2026 च्या आदेशानुसार डिझेलचा पुरवठा केवळ शासकीय कामकाज व अत्यावश्यक सेवा, जसे रुग्णवाहिका, यासाठीच करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खाजगी व्यक्ती किंवा संस्थांना डिझेल देताना आवश्यक कागदपत्रांची खातरजमा करूनच पुरवठा करण्याचे आदेश आहेत. नियमबाह्य विक्री केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल. 

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, इंधन व गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने घाबरून साठेबाजी करू नये व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिक माहितीसाठी नागरिकांनी संबंधित कंपनीच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.