Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली शिवसेना निवडणूक

शिवसेनेचे मतदार एकसंघ; आघाडी गेली पिछाडीवर

Hingoli Shiv Sena Election: हिंगोलीतील मतदात्यांच्या एकसंघित मतभागामुळे शिवसेनाचा उमेदवार पाठाला लागला असून अपक्ष उमेदवारी सुशिल देशमुख यांनी अंतिम फेरीत आघाडीच्या स्थानाने जिंकले.


शिवसेनेचे मतदार एकसंघ आघाडी गेली पिछाडीवर

Hingoli Shiv Sena Election |

 

अपक्ष उमेदवार सुशिल देशमुख आले लढतीमध्ये

हिंगोली (Hingoli Shiv Sena Election) : हिंगोली जिल्ह्यात एकंदरीत शिवसेनेचे मतदार एकसंघ राहीले. तर आघाडीच्या मतांत फुट झाल्यामुळे उमेदवार पिछाडीवर राहण्याची शक्यता आहे. अपक्ष उमेदवार सुशिल देशमुख यांनी शेवटच्या टप्प्यात चांगलीच आघाडी घेतली. निवडणूकीचा अंतिम निकाल दुसर्‍या पसंतीच्या मतांवर अवलंबून राहीले असा अंदाज तज्ञांकडून व्यक्त होत आहे. जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाकडे सर्वाधिक मतदान आहे.

या (Hingoli Shiv Sena Election) मतदान फारशी फाटाफुट होणार नाही. एखाद - दुसरा वगळता मतदान शिवसेनेच्या सईद खान यांनाच मिळेल असा अंदाज आहे. जिल्ह्यात दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील मुस्लिम मतदान खात्रीने महायुतीलाच मिळेल;  परंतु इतर मतदानात फाटाफुट होईल असा अंदाज आहे. भारतीय जनता पक्षाचे मतदार महायुतीलाच मतदान केल्याचे सांगत आहेत; परंतु त्यांच्यातील बहुतांश मते अपक्ष उमेदवार सुशिल देशमुख यांना मिळतील असा दावा देशमुखांचे समर्थक करीत आहेत. प्रारंभी फारशा चर्चेत नसलेल्या देशमुखांना जिल्ह्यातून बरीच मते मिळतील असा अंदाज व्यक्त होत असल्याने महाविकास आघाडीचे डॉ. विवेक नावंदर हे जिल्ह्यात पिछाडीवर राहतील असाही अंदाज आहे.

एकुण ४६६ पैकी ४६५ मतदान झाले असल्याने पहिल्या पसंतीच्या २३३ मतांवर उमेदवार निवडला जाणार आहे. कोणालाही पहिल्या पसंतीची २३३ मते न मिळाल्यास दुसर्‍या क्रमांकाच्या पसंतीच्या मतांची मोजणी करावी लागणार आहे. परभणी जिल्ह्यात सईद खान यांच्या विरोधकांना यश मिळाले तर दुसर्‍या क्रमांकाची मते मोजावी लागतील असा अंदाज आहे. हिंगोली जिल्ह्यात मात्र बहूतांश मतदारांनी केवळ पहिल्या पसंतीचेच मतदान  केल्याचे समजते. एकंदरीत महायुतीच्या उमेदवारांसाठी सोपी वाटणारी निवडणूक अपक्ष उमेदवारांच्या प्रयत्नांमुळे अटीतटीची झाल्याचे चित्र आहे. किमान हिंगोली जिल्ह्यात तरी (Hingoli Shiv Sena Election) महाविकास आघाडीचा उमेदवार पिछाडीवर राहील असा अंदाज आहे.