Hingoli Government Hospital: हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात ८४ रुग्णांचे डोकेच्या आणि मानाच्या कर्करोगासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सखोल जाणिवा मिळविण्यात आली.
हिंगोली (Hingoli Government Hospital) : जागतिक डोके आणि मान कर्करोग महिन्यानिमित्त हिंगोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयात विशेष कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ८४ रुग्णांची डोके आणि मानाच्या कर्करोगासाठी सखोल तपासणी व स्क्रिनिंग करण्यात आली. दंत रोग तज्ञ तथा नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ. फैसल खान यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर पार पडले. शिबिराचा मुख्य उद्देश सर्वसामान्य नागरिकांमध्ये डोके आणि मानाच्या कर्करोगाविषयी जनजागृती निर्माण करणे आणि आजाराचे प्राथमिक टप्प्यात निदान करणे हा होता.
यावेळी डॉ. फैसल खान यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले. तोंडात दीर्घकाळ राहणारी जखम, आवाजात बदल, गिळताना त्रास आणि मानेवर आलेली सूज यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. तसेच तंबाखू, गुटखा आणि धुम्रपान यांसारख्या व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. तपासणी दरम्यान १ रुग्णाची बायोप्सी करण्यात आली. तर १ रुग्णावर आवश्यकतेनुसार मुख-शस्त्रक्रिया आणि दंत शल्य शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया डॉ. फैसल खान यांनी केली.
या (Hingoli Government Hospital) शिबिरासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. श्रीचक्रधर मुंगल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्यासह डॉ. गीते, डॉ. दीपक मोरे, डॉ. गोल कदम, डॉ. नितीन पुरोहित, डॉ. मनीष बगडिया, डॉ. गोपाल कदम, डॉ. सतीश रूणवाल, डॉ. कंठे, डॉ. परदेशी, डॉ. स्नेहल नगरे, डॉ. मंगेश मुटकुळे, डॉ. विवेक तटू, डॉ. अरविंद कळंबे, तालुका आरोग्य अधिकारी जोगदंड, शंकर तावडे, गारुडी, शोएब शेख आणि रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. वेळेवर निदान आणि उपचारांमुळे कर्करोगावर मात करता येते, हा संदेश या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला.