Hingoli Ashadhi Ekadashi Bus: आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांना पंढरपूरला सुखकर दर्शनासाठी पाठविण्यासाठी हिंगोली एसटी आगारातून विशेष नियोजन करण्यात आले होते.
एका बसेसचा ७३० किमीचा प्रवास
हिंगोली (Hingoli Ashadhi Ekadashi Bus) : आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांना पंढरपूरला सुखकर दर्शनासाठी पाठविण्यासाठी हिंगोली एसटी आगारातून विशेष नियोजन करण्यात आले होते. आषाढी एकादशीसाठी हिंगोली आगारातून पंढरपूरकडे एकूण ५२ बसेस सोडण्यात आल्या. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरला जात असतात. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी आगार प्रशासनाने अतिरिक्त बसेसची व्यवस्था केली होती. हिंगोली आगारातून पंढरपूरसाठी थेट ५२ बसेस धावल्या. या बसेसमधून हजारो भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी प्रवास केला.
हिंगोली ते पंढरपूर या एका फेरीचे अंतर अंदाजे ७३० किलोमीटर आहे. त्यामुळे प्रत्येक बसेसने जाणे-येणे मिळून हा लांबचा प्रवास केला. आगारातील चालक आणि वाहकांनी देखील भाविकांना सहकार्य करत वेळेत सेवा दिली.
एसटीच्या या (Hingoli Ashadhi Ekadashi Bus) विशेष सेवेमुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. आषाढीच्या गर्दीत खासगी वाहनांचे दर वाढत असताना एसटीने माफक दरात आणि सुरक्षित प्रवास उपलब्ध करून दिल्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिला वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. आगार व्यवस्थापक शेख फेरोज यांनी सांगितले की, मागणी लक्षात घेऊन गरजेनुसार आणखी फेऱ्या वाढविण्यात आल्या होत्या. वारी संपेपर्यंत ही सेवा सुरू होती.विठ्ठलाच्या दर्शनासाठी एसटीमुळेच आम्ही वेळेत पोहोचू शकलो असे वारकऱी सांगत आहेत.