Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली पोलीस जनसंवाद

हिंगोली पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा तक्रारदारांशी 'संवाद', 13 तक्रारींचे निवेदन

Hingoli Police jansanvad: नागरिकांच्या तक्रारी समजून घेऊन त्यांचा जलद निपटारा करणे व पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढवून लोकाभिमुख कामकाजाद्वारे जनतेचा पोलिसांवरील विश्वास दृढ करणे


हिंगोली पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा तक्रारदारांशी संवाद 13 तक्रारींचे निवेदन

Hingoli Police jansanvad |

हिंगोली (Hingoli Police jansanvad) : नागरिकांच्या तक्रारी समजून घेऊन त्यांचा जलद निपटारा करणे व पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढवून लोकाभिमुख कामकाजाद्वारे जनतेचा पोलिसांवरील विश्वास दृढ करणे, या मुख्य उद्देशाने पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत 'जनसंवाद' हा विशेष उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी उमाप दर महिन्याला जिल्हा मुख्यालयांना भेटी देत असतात. या भेटीदरम्यान त्या-त्या जिल्ह्यातील तक्रारदारांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्या तक्रारी व अडचणी समजून घेऊन त्या तत्परतेने सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

याच अनुषंगाने दिनांक 29 जून रोजी श्री उमाप यांनी पोलीस अधीक्षक, हिंगोली कार्यालयात जिल्हा पोलीसांच्या कामकाजाचा मासिक आढावा घेतला. त्यानंतर दुपारी 2:30 ते 4:00 या वेळेत जिल्ह्यातील तक्रारदारांशी त्यांनी थेट 'संवाद' साधला. या संवाद सत्रात एकूण 13 तक्रारदारांनी आपले लेखी अर्ज श्री उमाप यांच्याकडे सुपूर्द केले. प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये मारहाणीच्या घटना, सायबर फसवणुकीचे प्रकार, तसेच पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या तपासाबाबतच्या तक्रारींचा प्रामुख्याने समावेश होता. 

श्री उमाप यांनी सदर सर्व तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली असून, त्यांच्या शीघ्र सोडवणुकीसाठी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना जागेवरच आवश्यक त्या सूचना दिल्या. तक्रारदारांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांची जलद सोडवणूक व्हावी यासाठी पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने यापूर्वीच 'संवेदना' ही तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित केली आहे. आज रोजी 'जनसंवाद' उपक्रमादरम्यान प्राप्त झालेले सर्व अर्ज 'संवेदना' पोर्टलच्या माध्यमातून पुढील चौकशी व कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात येणार आहेत. तसेच, प्रत्येक तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीचा आढावा नांदेड परिक्षेत्र कार्यालयातील फीडबॅक टीममार्फत घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. 

या (Hingoli Police jansanvad) संवाद कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक श्री श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक श्री कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी वसमत तसेच शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.