Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली ड्राय डे रद्द

हिंगोलीत चार दिवसांचा 'ड्राय डे' रद्द, उच्च न्यायालयाचा मद्यविक्रेत्यांना दिलासा

Hingoli Dry Day Cancelled: 'ड्राय डे' चा आदेश न्यायालयाने अंशत: रद्द केला. हिंगोलीच्या मद्यविक्रेत्यांनी वाईन शॉप मालकांनी मोठी उशीरा मिळाली.


हिंगोलीत चार दिवसांचा ड्राय डे रद्द उच्च न्यायालयाचा मद्यविक्रेत्यांना दिलासा

Hingoli Dry Day Cancelled |

हिंगोली (Hingoli Dry Day Cancelled) : औरंगाबाद खंडपीठाने हिंगोली जिल्ह्यातील मद्यविक्रेत्यांना मोठा दिलासा दिला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी 16, 17, 18 आणि 22 जून 2026 रोजी लागू केलेला चार दिवसांचा 'ड्राय डे' चा आदेश न्यायालयाने अंशतः रद्द केला आहे. 

हॉटेल न्यू संस्कार वाईन्स, हिंगोली यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती संदीपकुमार मोरे आणि न्यायमूर्ती वैशाली पाटील-जाधव यांच्या खंडपीठाने सोमवारी, 16 जून रोजी अंतरिम आदेश दिला. जिल्हाधिकाऱ्यांच्या 15 जूनच्या आदेशाला याचिकेत आव्हान देण्यात आले होते.

न्यायालयाने स्पष्ट केले की आता हिंगोली जिल्ह्यात केवळ दोनच दिवशी मद्यविक्री बंद (Hingoli Dry Day Cancelled) राहील. निवडणुकीच्या दिवशी म्हणजेच 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आणि मतमोजणीच्या दिवशी 22 जून रोजी सकाळी 8 पासून निकाल जाहीर होईपर्यंतच 'ड्राय डे' लागू राहील. 16 आणि 17 जून रोजीची मद्यबंदी न्यायालयाने उठवली आहे.

यापूर्वी जळगाव जिल्ह्यासाठी दाखल झालेल्या याचिकेतही न्यायालयाने असाच निर्णय दिला होता, त्याच आधारावर हिंगोलीसाठी हा आदेश देण्यात आला. या याचिकेची पुढील सुनावणी 24 जून 2026 रोजी ठेवण्यात आली आहे. या (Hingoli Dry Day Cancelled) निर्णयामुळे हिंगोलीतील हॉटेल व्यावसायिक आणि वाईन शॉप चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.