Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > आपले शहर > मुंबई

High Profile Sex Racket

मुंबईत हाय-प्रोफाईल देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रींसह दोघींची सुटका, मेकअप आर्टिस्ट दलाल अटकेत

गिरगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हाय-प्रोफाईल देहव्यापार रॅकेटवर मुंबई पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली.


मुंबईत हाय-प्रोफाईल देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रींसह दोघींची सुटका मेकअप आर्टिस्ट दलाल अटकेत

High Profile Sex Racket |

गिरगावातील हॉटेलवर मुंबई पोलिसांची धाड; बनावट ग्राहकाच्या मदतीने कारवाई, आर्थिक व्यवहारांसह हॉटेल व्यवस्थापनाचीही चौकशी

मुंबई (High Profile Sex Racket) : गिरगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हाय-प्रोफाईल देहव्यापार रॅकेटवर मुंबई पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत दोन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली असून, त्यापैकी एक अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची कलाकार आहे. तर दुसरी अभिनेत्री बंगाली आणि हिंदी चित्रपटांमध्ये छोट्या तसेच कॅमिओ भूमिकांमधून झळकली आहे. या प्रकरणात एका दलालाला अटक करण्यात आली असून, तो सेलिब्रिटींसोबत काम करणारा मेकअप आर्टिस्ट असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुंबई पोलिसांना गिरगावातील संबंधित हॉटेलमध्ये देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईची योजना आखली. या बेकायदेशीर प्रकाराची खात्री करण्यासाठी प्रथम एका बनावट ग्राहकाला हॉटेलमध्ये पाठविण्यात आले. माहितीची पुष्टी झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने छापा टाकून दोन महिलांची सुटका केली.

कारवाईदरम्यान पोलिसांनी एका संशयित दलालाला रंगेहाथ अटक केली. प्राथमिक तपासात तो मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींसोबत काम करणारा मेकअप आर्टिस्ट असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, संबंधित व्यक्तींची भूमिका तसेच हॉटेल व्यवस्थापनाचा सहभाग होता का, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

मुंबई पोलिसांनी अधिकृत निवेदनात सांगितले की, सुटका करण्यात आलेल्या महिलांची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. तपासादरम्यान त्यांना देहव्यापार करण्यास भाग पाडले जात असल्याचे समोर आले असून, ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणाचा तपास सुरू असून, पुढील चौकशीत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता असल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Related to this topic: