Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

Heavy Rain

अतिवृष्टीचा तडाखा! कुरखेड्यात दोन तलाव फुटले; शेकडो एकर धान पिकाची नासाडी

कुरखेडा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गूरनोली परिसरात मोठे नुकसान झाले आहे.


अतिवृष्टीचा तडाखा कुरखेड्यात दोन तलाव फुटले शेकडो एकर धान पिकाची नासाडी

Heavy Rain |

गूरनोली व बिजापूर येथे घटना; शेतकरी व मच्छीमारांचे मोठे नुकसान, तातडीच्या मदतीची मागणी

कुरखेडा : तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गूरनोली परिसरात मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मध्यरात्री गूरनोली येथील मोठ्या तलावाची पार फुटून मोठे भगदाड पडले. त्यामुळे तलावाखालील शेकडो एकर शेतजमिनीत पाणी शिरून धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

यंदा तालुक्यात नुकताच धान रोवणीचा हंगाम पूर्ण झाला असून पिके जोमाने वाढू लागली होती. मात्र अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे तलाव फुटल्याने मोठ्या वेगाने आलेल्या पाण्याच्या प्रवाहात अनेक शेतांतील धान पीक वाहून गेले. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे शंभर एकरांहून अधिक क्षेत्रातील पिकांची नासाडी झाली आहे.

याशिवाय तलावाच्या पारीलगत असलेल्या आठ ते दहा एकर शेतजमिनीत मुरूम, रेती व गाळाचा जाड थर साचल्याने ती जमीन लागवडीस अयोग्य होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या समोर उपजीविकेचे संकट उभे ठाकले आहे.

या घटनेची माहिती महसूल प्रशासनाला मिळताच तहसीलदार शशिकांत जाधव यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

दरम्यान, दुसरी घटना बिजापूर येथे घडली. येथील जुना मामातलावाची पार फुटल्याने सुमारे ६५ किलो मत्स्यबीज वाहून गेले. तसेच शेकडो एकर क्षेत्रावरील धान पीकही वाहून गेल्याने शेतकरी व मच्छीमार बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे.

या सर्व परिस्थितीची पाहणी करून प्रशासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट यांच्यासह प्रभाकर तुलावी व दिलीप दर्रो यांनी केली आहे.

Related to this topic: