Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

Heartwarming Story

खाकीतील कर्तव्य आणि पितृत्वाचा सुंदर संगम; हिंगोलीतील पोलिस कर्मचाऱ्याने जिंकली सर्वांची मनं

पोलिसांची वर्दी म्हणजे कठोर शिस्त आणि सततचे कर्तव्य, अशी सर्वसामान्यांची धारणा असते.


खाकीतील कर्तव्य आणि पितृत्वाचा सुंदर संगम हिंगोलीतील पोलिस कर्मचाऱ्याने जिंकली सर्वांची मनं

Heartwarming Story |

हिंगोली (Heartwarming Story) : पोलिसांची वर्दी म्हणजे कठोर शिस्त आणि सततचे कर्तव्य, अशी सर्वसामान्यांची धारणा असते. मात्र, हिंगोलीतील एका पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या संवेदनशील वागणुकीतून खाकी वर्दीमागील हळवं मन सर्वांसमोर आणत नागरिकांची मनं जिंकली.

सोमवारी सकाळी खटकाळी रोडवरील नांदेडकडे जाणाऱ्या मार्गावर उभारण्यात आलेल्या पल्स पोलिओ बूथवर हा हृदयस्पर्शी प्रसंग घडला. ड्युटीवर जात असताना संबंधित पोलिस कर्मचारी बूथजवळ थांबला. कारण त्या ठिकाणी त्याचे स्वतःचे बाळ पल्स पोलिओचे डोस घेण्यासाठी आले होते.

क्षणाचाही विलंब न करता त्यांनी वर्दीची पर्वा न करता सर्वप्रथम वडिलांचे कर्तव्य पार पाडले. बाळाला प्रेमाने मांडीवर घेत, कपाळावरून हात फिरवत त्यांनी आपल्या हाताने दोन थेंब पोलिओचे डोस पाजले. बाळाच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस हास्य पाहून त्यांच्या चेहऱ्यावरही समाधान झळकले.

काही क्षणांतच त्यांनी पुन्हा आपली जबाबदारी स्वीकारली. बाळाला पत्नीच्या स्वाधीन करून टोपी सावरत ते पुन्हा कर्तव्यावर रवाना झाले. कायद्याचे रक्षण करणारा अधिकारी आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी निभावणारा पिता अशा दोन्ही भूमिका त्यांनी एकाच वेळी समर्थपणे पार पाडल्या.

या प्रसंगाचे साक्षीदार असलेल्या आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांनी हा भावनिक क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. वर्दीतील या हळव्या वडिलांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होताच "हाच खरा हिरो", "सलाम या कर्तव्याला" अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या.

खाकी वर्दी म्हणजे केवळ कडक शिस्त आणि जबाबदारी नव्हे, तर त्यामागे एक संवेदनशील, कुटुंबवत्सल आणि माणुसकी जपणारे मनही असते, याची प्रचिती या प्रसंगातून हिंगोलीकरांना आली.

Related to this topic: