Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

Gutkha Seizure

चिखली पोलिसांची मोठी कारवाई; न्यायालयाच्या आदेशानुसार सुमारे ७२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा नष्ट

न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपरिषद चिखलीच्या डंपिंग यार्डमध्ये प्रतिबंधित गुटखा नियमानुसार नष्ट करण्यात आला.


चिखली पोलिसांची मोठी कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसार सुमारे ७२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा नष्ट

Gutkha Seizure |

चिखली (Gutkha Seizure) : चिखली पोलीस स्टेशनमध्ये सन २०२३ पासून विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला एकूण ७१ लाख ९९ हजार ३२५ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा गुरुवारी (दि. २ जुलै) मा. न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपरिषद चिखलीच्या डंपिंग यार्डमध्ये नियमानुसार नष्ट करण्यात आला.

मा. न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित विभागांच्या उपस्थितीत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित गुटख्याची नियमानुसार विल्हेवाट लावल्यामुळे मुद्देमालाचा गैरवापर होण्याची शक्यता टळली असून अन्न सुरक्षा व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड तथा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार सुनील माळोदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल छाया घुबे, राजू चौधरी, विजय किटे, प्रकाश शिंदे, संदीप वाघ, राजेश मापारीसुनील राजपूत यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.

प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या साठवणूक व विक्रीविरोधात पोलीस प्रशासनाकडून सातत्याने कठोर कारवाई करण्यात येत असून, न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याची ही कारवाई त्याचाच एक भाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related to this topic: