Breaking News
  • परभणीतील हनुमान मंदिरातील सभा मंडप कोसळला, 30-40 जण दबल्याची माहिती
  • परळीत दिवसाढवळ्या अपहरण ऊसतोडणीच्या'उचल' पैशांवरून तरुणाला गाडीत टाकून पळवले
  • एकही खासदार कुठंही जाणार नाही, शिंदेगटाच्या नेत्याच्या दावा
  • पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे : अण्णा हजारे
  • मान्सूनच्या विलंबामुळे मराठवाड्यात खरीप पेरण्या रखडल्या; शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
  • छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेला परिसरातील पुंडलिकनगर येथील महारुद्र हनुमान मंदिराजवळ आज पहाटे दोन मजली बिल्डिंगमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एका महिलेचा मृत्यू झाला.
  • सोलापूर जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे विहीरीत टेम्पो कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 40 चाळीस लाख रूपयांची मदत देण्यात आली.
  • डी.आर.डी.ओचे डॉ प्रदीप कुरुलकरवर आरोप निश्चित, खटल्याच्या सुनावणीचा मार्ग अखेर मोकळा
  • छत्रपती संभाजी नगर येथील ATS पथकांच्या १५ टीम कडून विविध भागात धाडी

होम > आपले शहर > मुंबई

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; आता मिळणार ‘स्पेसियस’ घरे

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.


शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आता मिळणार ‘स्पेसियस’ घरे

Government Quarters |

मुंबई (Government Quarters) : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शासकीय निवासस्थानी राहणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना आता अधिक प्रशस्त आणि आधुनिक घरांचा लाभ मिळणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शासकीय घरांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शासकीय निवासस्थाने अधिक सुसज्ज, सोयीस्कर आणि दर्जेदार बनणार आहेत. सातव्या वेतन आयोगानुसार तसेच वेतनगटांच्या आधारे घरांच्या क्षेत्रफळाचे नव्याने नियोजन करण्यात आले आहे. हा निर्णय नव्याने उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांवर लागू राहणार आहे.

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी टाईप-A ते टाईप-G या विविध श्रेणींमध्ये निवासस्थानांची उभारणी केली जाणार आहे. उच्च वेतनश्रेणीतील अधिकाऱ्यांसाठी सुमारे 240 चौ.मी. पर्यंत तर कमी वेतनगटातील कर्मचाऱ्यांसाठी अंदाजे 45 चौ.मी. पर्यंत क्षेत्रफळ निश्चित करण्यात आले आहे. सुधारित आराखड्यानुसार प्रत्येक घरात बैठक खोली, जेवणासाठी स्वतंत्र जागा, शयनकक्ष, स्वच्छतागृह, स्वयंपाकघर, बाल्कनी यांचा समावेश असेल. काही निवासस्थानांमध्ये कार्यालयीन कक्ष, अभ्यासिका तसेच सेवकांसाठी स्वतंत्र खोलीची सुविधाही उपलब्ध राहणार आहे. यामुळे अधिकाऱ्यांना अधिक आरामदायी आणि कार्यक्षम निवासव्यवस्था मिळेल.

तसेच, प्रत्येक खोलीत इंटरनेट आणि दूरध्वनीसाठी स्वतंत्र कनेक्शन पॉईंटची सोय करण्यात येणार आहे. बहुमजली इमारतींमध्ये जिने, कॉरिडॉर आणि इतर सामायिक सुविधा स्वतंत्रपणे नियोजित केल्या जाणार आहेत. शासनाचा हा निर्णय केवळ नव्या बांधकाम प्रकल्पांसाठी लागू असेल. सध्या सुरू असलेल्या किंवा पूर्ण झालेल्या प्रकल्पांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. तसेच, आधीच वाटप करण्यात आलेल्या निवासस्थानांच्या श्रेणीमध्येही कोणताही बदल केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Related to this topic: