Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

गोरेगाव जलजीवन मिशन

गोरेगावकरांच्या पाणीप्रश्नाला अखेर न्याय; तीन वर्षांपासून बंद असलेले जलजीवन मिशनचे काम पुन्हा सुरू

Goregaon Jal Jeevan Mission: गोरेगाव येथील नागरिकांना सात वर्षांपासूनच भेडसावत असलेला पाणीप्रश्न आज अखेर जाहीर झाला आहे. बंद असलेल्या जलजीवन मिशनचा मुख्य लाईन पुन्हा सुरू


गोरेगावकरांच्या पाणीप्रश्नाला अखेर न्याय तीन वर्षांपासून बंद असलेले जलजीवन मिशनचे काम पुन्हा सुरू

Goregaon Jal Jeevan Mission |

गोरेगाव (Goregaon Jal Jeevan Mission) : गोरेगाव येथील नागरिकांना अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर अखेर सकारात्मक तोडगा निघाला असून, जलजीवन मिशन अंतर्गत तीन वर्षांपासून बंद पडलेले मेन लाईनचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. यामुळे गोरेगावसारख्या मोठ्या लोकवस्तीच्या गावाला लवकरच हक्काचे व शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या कामासाठी आमदार संतोष बांगर, युवा सेना जिल्हा प्रमुख राम कदम,  माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. गोरेगाव चौफुली येथे करण्यात आलेले रास्ता रोको आंदोलन, विविध शासकीय कार्यालयांना दिलेली निवेदने, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठका आणि सतत केलेला पत्रव्यवहार यामुळे प्रशासनाला या गंभीर प्रश्नाची दखल घ्यावी लागली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, हिंगोली यांनी यापूर्वी गोरेगावला सहा महिन्यांच्या आत पाणीपुरवठा सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी सातत्याने प्रयत्न करत असून बंद पडलेले काम पुन्हा गतीने सुरू करण्यात आले आहे. यामुळे जलजीवन मिशनच्या कामाला नवसंजीवनी मिळाली आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत शिवसेना तालुका प्रमुख अमोल पाटील खिल्लारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी गावकऱ्यांच्या पाणीप्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करत प्रशासनासमोर प्रश्न प्रभावीपणे मांडला. त्यांच्या अथक प्रयत्नांना आणि संघर्षाला आज यश मिळाले असून गोरेगावच्या विकासाच्या दृष्टीने हा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.

गोरेगावसह परिसरातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून काम वेळेत पूर्ण करून गावाला नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी केलेला संघर्ष आणि त्यातून मिळालेले हे यश भविष्यातील विकासकामां साठीही प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

"जनतेच्या हक्कासाठी संघर्ष, विकासासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि गोरेगावकरांना हक्काचे पाणी मिळवून देण्याचा निर्धार यामुळेच आज हा महत्त्वाचा टप्पा गाठता आला आहे." असे मत शिवसेना तालुका प्रमुख अमोल पाटील खिल्लारी यांनी व्यक्त केले.