Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

रेल्वे गोडाऊन आग

परभणीच्या गंगाखेड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात भंगारच्या गोडाऊनला भीषण आग

Railway Godown Fire: गंगाखेड येथील रेल्वे स्थानकाचे भंगार गोडाऊनला शुक्रवारी सकाळी आग लागली. घरातील सुमारे दहा लाख रुपयांचे सामग्री जळून गेले, तर तसेच एक घरही जळून खाक झाले


परभणीच्या गंगाखेड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात भंगारच्या गोडाऊनला भीषण आग

Railway Godown Fire |

 

लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक; जिवित नाही...!

परभणी (Railway Godown Fire) : गंगाखेड येथील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या एका भंगारच्या गोडाऊनला शुक्रवार १९ जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत गोडाऊनसह शेजारी असलेल्या घरातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

गंगाखेड रेल्वे स्थानक (Railway Godown Fire) परिसरात शासकीय गोडाऊन जवळ असलेल्या सोहेल अहमद अब्दुल खदिर खुरेशी यांच्या भंगारच्या गोडाऊनला शुक्रवार १९ जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यात प्लास्टिक व भंगार साहित्याला लागलेल्या आगीने पाहता पाहता रौद्र रुपधारण करत स्टील मटेरियल, प्लास्टिक मटेरियल, ठिबक सिंचन साहित्य, बिसलेरी बॉटल व टिन शेड आदी अंदाजे दहा लाख रुपयांपेक्षा अधिकचे साहित्य जळून खाक होऊन नुकसान झाले व गोडाऊन शेजारी असलेल्या राजाभाऊ गुंडप यांच्या घराला ही आगीने आपल्या कवेत घेतल्याने यात एक दुचाकी, एक सायकल, घरात ठेवलेली रोख रक्कम, गादी, पलंग असे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.

आगीची घटना घडताच परिसरातील नागरिकांनी व नगरसेवक शेख साबेर, सुनिल चौधरी, सय्यद सलीम, अब्दुल रहमान खुरेशी, सय्यद जहीर, इरफान खान, सय्यद सलीम, शेख अखिल, रहेमतुल्ला, सय्यद दिलावर, गोपाळ चौधरी, सय्यद अलियोद्दीन, अमजद पठाण, दिपक पारवे, आजमत खान आदींनी धाव घेत खाजगी पाण्याचे टँकर तसेच गंगाखेड नगर परिषद व जि सेव्हन शुगरचे तसेच पालम नगर पंचायतचे अग्निशमन दल पाचारण करून प्रचंड प्रमाणात आगीचे लोट उठलेली (Railway Godown Fire) आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. तब्बल दोन तास अथक परिश्रम घेऊन ही आग नियंत्रणात आली नाही व संपूर्ण गोडाऊन तसेच गोडाऊन शेजारी असलेले एक घर जळून खाक झाले आहे.