Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी फसवणूक व धमकी

ना सभा लावली,ना प्रचार साहित्य देत गंडविले...

Parbhani Fraud and Threat: निवडणुकांच्या प्रचारासाठीच्या पाच जणांवर गंगाखेड येथे सात लाखांची फसवणूक करण्याचा आरोप आहे. आशाबाई मुंढे यांनी हा आरोप केला. धमकी आणि रकमेची परतवणूक


ना सभा लावलीना प्रचार साहित्य देत गंडविले

Parbhani Fraud and Threat |

 

परभणीत सात लाखाची फसवणूक केल्या प्रकरणी पाच जणांवर गंगाखेड पोलिसात गुन्हा

गंगाखेड (Parbhani Fraud and Threat) : निवडणुकीसाठी प्रचार सभा लवणे तसेच इतर प्रचार साहित्य पुरविण्यासाठी सात लाख रुपये घेत सभा लावली नाही तसेच साहित्यही दिले नाही. पैसे परत न करता सात लाखाची फसवणूक केली. ही घटना फेब्रुवारी २०२६ मध्ये वंचित बहुजन आघाडी शहर कार्यालय गंगाखेड येथे घडली. या प्रकरणी १७ जुनला गंगाखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशाबाई मुंढे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी या निवडणूक लढवत होत्या. निवडणूक जिंकण्यासाठी प्रकाशराव आंबेडकर यांची प्रचार सभा लावण्यासाठी तसेच निवडणूक प्रचारातील साहित्य पुरवितो, असे म्हणत आरोपींनी फिर्यादीकडून सात लाख रुपये घेतले. त्यानंतर प्रचार सभा लावली नाही तसेच कोणतेही साहित्य पुरविले नाही. फिर्यादीने आरोपींना रक्कम परत मागितली असता आज, उद्या रक्कम देतो, असे म्हणत वेळ मारुन नेली. (Parbhani Fraud and Threat) फिर्यादीची फसवणूक केली तसेच फिर्यादी व त्यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आशिष चौधरी, मनोहर मारोती वावळे, गजानन पारवे, सुनील माने, अनुराधा एस. लिंगापुरे यांच्यावर गंगाखेड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. तपास सपोनि. सानप करत आहेत.