Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

Gambling Raid

सेनगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; शेतातील जुगार अड्ड्यावर छापा

सेनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पानकनेरगाव येथे बाभळीच्या झाडाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सेनगाव पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत छापा टाकला.


सेनगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई शेतातील जुगार अड्ड्यावर छापा

Gambling Raid |

पानकनेरगाव (Gambling Raid) : सेनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पानकनेरगाव येथे बाभळीच्या झाडाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सेनगाव पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत छापा टाकला. पानकनेरगाव येथील अनिल माणिकराव जाधव यांच्या शेतात झन्ना-मन्ना नावाचा जुगार पैसे लावून खेळला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

नुकतेच सेनगाव पोलीस ठाण्यात रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांच्या आदेशानुसार बिट जमादार तुकाराम मारकळ व त्यांच्या सहकारी पथकाने शुक्रवार (१९ जून) रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या सुमारास शेतात छापा टाकला. त्यावेळी आठ जण गोलाकार बसून पत्त्यांचा डाव खेळताना आढळले. पोलिसांना पाहताच त्यापैकी पाच जुगारी घटनास्थळावरून पसार झाले, तर तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या कारवाईत पोलिसांनी जुगाराचे साहित्य, ४ हजार ४०० रुपये रोख रक्कम, २४ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल आणि दीड लाख रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण १ लाख ७८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस अंमलदार तुकाराम मारकळ यांच्या फिर्यादीवरून अशोक काशीनाथ आप्पा हेन्द्रे, अमोल शिवराम राऊतकर, अनिल माणिकराव जाधव, शिशंकर उचितराव देशमुख, कैलास भास्कर जाधव, प्रवीण गजानन वाठोरे, बाबाराव मनोहर बांगर आणि घनश्याम दायमा या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पाच जण फरार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी दिली.

सेनगाव पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील जुगार खेळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव, जमादार राजेश जाधव, तुकाराम मारकळ, जिवन मस्के, परशू नागरे व सहकारी पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related to this topic: