Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

टेकाडी परिसरातील जुगार अड्ड्यावर एलसीबीची धाड; सात जणांवर गुन्हा

नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेकाडी परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून सात जणांना रंगेहाथ पकडले.


टेकाडी परिसरातील जुगार अड्ड्यावर एलसीबीची धाड सात जणांवर गुन्हा

Gambling Den Raid |

मोबाईल, दुचाकीसह २.१० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

कन्हान (Gambling Den Raid) : नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेकाडी परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून सात जणांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी वाहन आणि जुगाराचे साहित्य असा एकूण २ लाख १० हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार (११ जून) रोजी नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कन्हान पोलिसांसह संयुक्त कारवाई केली. टेकाडी शिवारातील कोळसा खदान क्रमांक ६ परिसरातील झाडीझुडपांमध्ये अवैधरित्या जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी सात आरोपी ५२ ताशपत्त्यांच्या साहाय्याने जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून सर्वांना ताब्यात घेतले.

कारवाईदरम्यान विजय केवलदास गेडाम (४०), मोहसिन मोविन शेख (३५), निलेश मुनेश नानेट (४०), मोबीदउर रहमान अब्दुल रशीद (३०), सुरज रघुवीर मेश्राम (३५), शारुख खान शमशेर खान (३०) आणि सचिन प्रकाश यादव (३९) या सात आरोपींना अटक करण्यात आली.

पंचांसमक्ष करण्यात आलेल्या जप्ती कारवाईत ५२ ताशपत्ते, ४० हजार ६०० रुपयांची रोख रक्कम, हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी (एमएच-३१-एयू-८५९२), मोबाईल फोन, एलईडी लाईट, दरी तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख १० हजार ९५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी संबंधित सात आरोपींविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहेत.

Related to this topic: