Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

भोसी वासरु मृत्यू

धान खाल्याच्या संशयावरून वासराच्या डोक्यात दगड मारल्याने मृत्यू

Bhosi calf Death: भोसीच्या गावातील शेतकऱ्याने गाईच्या वासरूला धान खाल्याच्या संशयावर दगड मारून त्याचा मृत्यू झाला. यामुळे पोलिसांना अजून तपास चालु आहे.


धान खाल्याच्या संशयावरून वासराच्या डोक्यात दगड मारल्याने मृत्यू

Bhosi calf Death |

औैंढा नागनाथ (Bhosi calf Death) : तालुक्यातील भोसी येथे शेतातील धान खाल्ल्याच्या संशयावरून गाईच्या वासराच्या डोक्यात दगड मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना  ५ जुलै रविवार रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसी येथील गोविंद बडकुलाल जैस्वाल यांच्या मालकीचे वासरू गावातील बसस्थानका जवळील पडीत जागेत चरत होते. यावेळी शेतातील धान खाल्ल्याच्या संशयावरून राजकुमार मारोती चिभडे याने (Bhosi calf Death) वासराच्या डोक्यात दगड मारला या हल्ल्यात वासरू गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी गोविंद बडकुलाल जैस्वाल यांनी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राजकुमार मारोती चिभडे राहणार भोसी याच्याविरुद्ध औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात ५ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास राठोड करीत आहेत.