Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

गडचांदूर अवैध धंदे

गडचांदूरात राजकीय क्षेत्रातील 'पांढरपेशी' अवैध धंद्यात; तक्रारकर्त्याला  मारहाण, गुन्हा दाखल

Gadchandur Illegal Gambling: वैध धंद्यांविरोधात पोलिसात तक्रार करणाऱ्या आपल्याच पक्षाच्या तालुका प्रमुखाला गडचांदूर शहर प्रमुखाने अश्लील शिवीगाळ व मारहाण केल्याने शहरात तीव्र संताप व्यक्त


गडचांदूरात राजकीय क्षेत्रातील पांढरपेशी अवैध धंद्यात तक्रारकर्त्याला  मारहाण गुन्हा दाखल 

Gadchandur Illegal Gambling |

कोरपना (Gadchandur Illegal Gambling) : तालुक्यातील गडचांदूर शहरात राजकीय वरदहस्त असलेल्या काही 'पांढरपेशी' व्यक्तींकडून उघडपणे अवैध धंदे चालवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या अवैध धंद्यांविरोधात पोलिसात तक्रार करणाऱ्या आपल्याच पक्षाच्या तालुका प्रमुखाला गडचांदूर शहर प्रमुखाने अश्लील शिवीगाळ व मारहाण केल्याने शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे गडचांदूर परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गडचांदूर आणि परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून (Gadchandur Illegal Gambling) जुगार, सट्टापट्टी वरली मटका, झेंडीमुंडी व इत्तर अवैध  काळे धंदे जोरात सुरू आहेत. या धंद्यांच्या मागे शहरातील काही बड्या राजकीय पक्षांशी संबंधित पांढरपेशी नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा थेट हात असल्याची चर्चा होती . या अवैध व्यवसायांमुळे परिसरातील शांतता भंग होत असल्याने, धाडस दाखवून याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे कोरपना तालुका प्रमुख राकेश राठोड यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीचा राग मनात धरून  दि.२४ बुधवारला दुपारी १२. ३० वाजताच्या दरम्यान (Gadchandur Illegal Gambling) अवैध धंदा करणाऱ्या गडचांदूर शहर प्रामुख विकेश राठोड याने तालुका प्रमुख राकेश राठोड याला भरचौकात गाठले. "आमच्या धंद्याविरुद्ध तक्रार करायची तुझी लायकी कशी झाली?" असे म्हणत त्याने अश्लील शिवीगाळ करीत तक्रारदाराला मारहाण केल्याचे तक्रारीत नमुद आहे. पोलिसात तक्रार झाल्याने चर्चेचे बिंग आता फुटले असून  गडचांदूर पोलिसांनी आरोपी विकेश राठोड विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार २९६, ११५(२),३५१(२) कलमानव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे 

 राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते अवैध धंद्यात (Gadchandur Illegal Gambling) असल्याने गडचांदूरात गुन्हेगारांचे मनोबल एवढे वाढले आहे का, की आता तक्रार करणाऱ्यांवरही उघडपणे हल्ले होऊ लागले आहेत? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. "गुन्हेगार कोणताही असो किंवा त्याला कोणाचाही राजकीय वरदहस्त असो, त्याची गय केली जाऊ नये आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई केली  जावी अशा प्रतिक्रिया गडचांदूर शहरातील नागरिकांतून येत आहेत.

पोलिसात दिलेल्या तक्रारी नुसार (Gadchandur Illegal Gambling) अवैध धंद्याची तक्रार करणारे राकेश राठोड हे कोरपना शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख असून  ज्यांच्या विरोधात तक्रार आहेत ते विकेश राठोड हे शिवसेना शिंदे गटाचे गडचांदूर शहर प्रमुख आहे समाजात राजकीय क्षेत्रात राहून अवैध धंद्यात स्वतः उतरणारे पदाधिकारी असेल तर पक्षाची ध्येय, धोरणाची प्रतिमा मल्लीन होत असल्याची भावना जमिनीवरील कार्यकर्त्यात ओरड आहे जिल्हा स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी अवैध धंद्यात असलेल्याची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्याची गरज आहे.