Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > उत्त्तर महाराष्ट्र > नाशिक

Food Poisoning

मटण-दही खाल्ल्यानंतर शेतकरी दाम्पत्याची प्रकृती बिघडली; पत्नीचा मृत्यू, पतीची प्रकृती गंभीर

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील अख्तावाडे गावात अन्न विषबाधेचा संशय असलेली धक्कादायक घटना समोर आली आहे.


मटण-दही खाल्ल्यानंतर शेतकरी दाम्पत्याची प्रकृती बिघडली पत्नीचा मृत्यू पतीची प्रकृती गंभीर

Food Poisoning |

नाशिकच्या बागलाण तालुक्यातील अख्तावाडे गावातील घटना; अन्नाचे नमुने पुणे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले

नाशिक (Food Poisoning) : नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील अख्तावाडे गावात अन्न विषबाधेचा संशय असलेली धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रीच्या जेवणात मटण आणि त्यानंतर दही खाल्ल्यानंतर एका शेतकरी दाम्पत्याची प्रकृती अचानक खालावली. उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला असून पतीवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नेमके कारण शोधण्यासाठी प्रशासनाने तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अख्तावाडे गावातील ६८ वर्षीय द्वारकाबाई हयालीज आणि त्यांचे ७८ वर्षीय पती शांताराम हयालीज यांनी घरी रात्रीच्या जेवणात मटणाचे सेवन केले. त्यानंतर दोघांनी दहीही खाल्ले. काही वेळातच दोघांनाही अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने बिघाड झाला.

कुटुंबीयांनी तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना द्वारकाबाई हयालीज यांचा मृत्यू झाला. शांताराम हयालीज यांच्यावर मालेगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे.

घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित अन्नाचे नमुने संकलित करून पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही घटना अन्न विषबाधेमुळे घडली की इतर कोणते कारण होते, याबाबत स्पष्टता येणार आहे.

स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभाग या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वैज्ञानिक तपासाचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. सध्या सर्व शक्यतांचा विचार करून तपास सुरू असून, अधिकृत निष्कर्ष येईपर्यंत कोणतेही कारण निश्चित मानले जाणार नाही.

Related to this topic: