Breaking News
  • Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर
  • Gadchiroli: कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
  • Raigad - माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक
  • Nagpur: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर
  • Nagpur: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला
  • Nashik: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
  • नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी
  • खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

होम > आपले शहर > पुणे

Exam Stress

NEET परीक्षेतील अपयशाचा मानसिक धक्का; साताऱ्यात १८ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शेरे गावात NEET परीक्षेतील अपयशामुळे मानसिक तणावात असलेल्या १८ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.


neet परीक्षेतील अपयशाचा मानसिक धक्का साताऱ्यात १८ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

Exam Stress |

कराड तालुक्यातील शेरे गावातील घटना; विषारी औषध प्राशनानंतर उपचारादरम्यान मृत्यू, मसूर पोलिसांकडून तपास सुरू

 

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शेरे गावात NEET परीक्षेतील अपयशामुळे मानसिक तणावात असलेल्या १८ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. समीक्षा दीपक पवार असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, विषारी औषध प्राशन केल्यानंतर उपचार सुरू असताना सोमवारी तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समीक्षा दीपक पवार हिने गेल्या वर्षी NEET परीक्षा दिली होती. मात्र, निकालात अपयश आल्यापासून ती मानसिक तणाव आणि नैराश्याचा सामना करत होती. या अवस्थेतच तिने २३ जुलै रोजी उंदरांना मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विषारी वड्यांचे सेवन करून टोकाचे पाऊल उचलले.

घटना घडल्यानंतर सुरुवातीला तिने विषारी पदार्थ सेवन केल्याची माहिती घरातील कोणालाही दिली नव्हती. दोन दिवसांनंतर विषाचा परिणाम शरीरावर जाणवू लागला आणि तिला तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर तिने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला.

समीक्षाची प्रकृती गंभीर झाल्यानंतर नातेवाईकांनी २६ जुलै रोजी तिला कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच सोमवारी तिची प्राणज्योत मालवली.

या घटनेमुळे कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून आई-वडिलांनी अक्षरशः टाहो फोडला. स्पर्धा परीक्षांमधील अपयशामुळे विद्यार्थ्यांवर वाढणाऱ्या मानसिक तणावाचा प्रश्न या घटनेनंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणाची नोंद करून मसूर पोलिस अधिक तपास करत आहेत.

Related to this topic: