Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर

सिंदेवाही चिमुकली मृत्यू

काळजाचा थरकाप! ई-रिक्षाच्या धडकेत अडीच वर्षांच्या चिमुकलीचा करुण अंत; नवरगाव येथील घटना

Sindewahi Little Girl Death : घराशेजारील रस्त्याच्या कडेला खेळत असताना एका मालवाहक ई-रिक्षाने दिलेल्या जोरदार धडकेत अडीच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना


काळजाचा थरकाप ई-रिक्षाच्या धडकेत अडीच वर्षांच्या चिमुकलीचा करुण अंत नवरगाव येथील घटना

Sindewahi Little Girl Death |

सिंदेवाही (Sindewahi Little Girl Death ) : घराशेजारील रस्त्याच्या कडेला खेळत असताना एका मालवाहक ई-रिक्षाने दिलेल्या जोरदार धडकेत अडीच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना नवरगाव येथील महादेव मोहल्ला येथे घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीने रुग्णालयात नेत असतानाच वाटेत दम तोडला. या घटनेमुळे संपूर्ण नवरगाव परिसरासह सिंदेवाही तालुक्यात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

​आई-वडिलांची एकुलती एक कन्या

श्रीजा महेश गहाणे (वय २. वर्ष ६ महिने  रा. नवरगाव) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. ती तिच्या आई-वडिलांना एकुलती एक मुलगी होती. तिच्या अचानक जाण्याने गहाणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातून तीव्र शोक व्यक्त होत आहे. नवरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या महादेव मोहल्ला येथे चिमुकली श्रीजा आपल्या घराशेजारील रस्त्याच्या कडेला खेळत होती. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना, भरधाव येणाऱ्या एका मालवाहक ई-रिक्षाने तिला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात श्रीजा गंभीर जखमी झाली.

​अपघात घडताच स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी तिला तात्काळ उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ केली. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेतच तिची प्राणज्योत मालवली.

​घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करून प्रेत शिविच्छेदनासाठी पाठविले  अपघातास कारणीभूत असलेली मालवाहक ई-रिक्षा आणि चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या (Sindewahi Little Girl Death) दुर्दैवी घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला . चिमुकलीचा शवविच्छेदन करून घरी आणले असता हजार नागरीकांनी प्रचंड गर्दी केली .  पुढील तपास सिन्देवाही पोलीस करीत  आहेत. मात्र, या घटनेमुळे लहान मुलांच्या रस्त्यावरील सुरक्षिततेचा निर्माण झाला आहे .

Related to this topic: