Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी शेतकरी मृत्यू

परभणीत लोंबकळणार्‍या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने शेतकर्‍याचा मृत्यू

Parbhani farmer death: ४५-वयाच्या शेतकर्‍याचे मृतदेह परभणी येथील शेतात आढळून पडले. त्याने विद्युत वाहिनीच्या स्पर्शामुळे विजेचा धक्का घेतला होता, असे पोलिसांचे नावतार आहे.


परभणीत लोंबकळणार्‍या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने शेतकर्‍याचा मृत्यू

Parbhani farmer death |

 

पूर्णा शहरातील घटना; दोन दिवसापासून बेपत्ता होता शेतकरी

परभणी (Parbhani farmer death) : पूर्णा शहरालगतच्या शेतात लोंबकळत असलेल्या विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने ४५ वर्षीय शेतकर्‍याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेतकर्‍याचा मृतदेह शनिवार २५ जुलै रोजी दुपारी शेतातील नालीत आढळून आला. याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राजेश नामदेव सोनवणे (वय ४५, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, पूर्णा) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. शहरालगत असलेल्या शेतातील आखाड्यावर जनावरांना चारा-पाणी देण्यासाठी ते २३ जुलै रोजी सकाळी सुमारे ११ वाजता घरातून निघाले होते. रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. बेपत्ता झाल्याची तक्रारही पूर्णा पोलिसांत दाखल करण्यात आली होती.  दरम्यान, २५ जुलै रोजी दुपारी नातेवाईक शेतात शोध घेत असताना राजेश सोनवणे यांचा मृतदेह शेतात जाण्यासाठी खोदलेल्या नालीत पडलेल्या अवस्थेत आढळून आला.

घटनेची (Parbhani farmer death) माहिती मिळताच फौजदार श्रीनिवास पडलवार, जमादार आनंद सोनकांबळे, राहुल मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, पूर्णा येथे पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर डॉक्टरांनी विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. प्राथमिक तपासात शेतातील लोंबकळणार्‍या विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.  तपास जमादार राहुल मोरे करीत आहेत.