Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

डॉ. प्रकाश अंभोरे

डॉ. प्रकाश अंभोरे यांना ‘राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार’ प्रदान

Dr. Prakash Ambhore: हिंगोली येथे संज्ञानिक शिक्षण व सामाजिक सेवा करणारे डॉ. प्रकाश अंबोरेंना राजयस्तरिय पुरस्कार प्रदान करून गौरवित केले गेले.


डॉ प्रकाश अंभोरे यांना ‘राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार’ प्रदान

Dr. Prakash Ambhore |

हिंगोली (Dr. Prakash Ambhore) : शिक्षण, समाजसेवा, संशोधन, साहित्य, विज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय व बहुआयामी योगदान देणारे भारतीय विद्या मंदिर शिक्षण संस्थेच्या श्रीमती शांताबाई मुंजाजी दराडे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा हिंगोली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश सखाराम अंभोरे (Dr. Prakash Ambhore) यांना ‘राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार – २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून २६ जून रोजी सामाजिक न्याय सभागृह, बुलढाणा येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन संजीवनी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्था, जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष डॉ. निरुत्तीभाऊ राजेजाधव यांनी केले होते.
पुरस्कार प्रदान करताना आयोजकांनी नमूद केले की, डॉ. प्रकाश अंभोरे यांनी शिक्षण क्षेत्राला केवळ व्यवसाय न मानता समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम म्हणून स्वीकारले असून, शैक्षणिक गुणवत्ता, सामाजिक बांधिलकी, संशोधन, साहित्य, विज्ञान, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या दिशादर्शक व प्रेरणादायी योगदानाची दखल घेऊन त्यांना ‘राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार’ प्रदान करण्यात येत आहे.

या यशाबद्दल त्यांचे पीएच.डी. मार्गदर्शक डॉ. संजय देवडे (खंडेलवाल कॉलेज, अकोला), भारतीय विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. मदन मार्डीकर, सचिव ॲड. गयबाराव नाईक, संचालक ॲड. केशवराव शिरसाट व पंडितराव बांगर, उपमुख्याध्यापक अनिल लोळेवार, पर्यवेक्षक भारत शिंदे, विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सुरेशराव वानखेडे, डॉ. मदनराव मुसळे, चंद्रकांत कल्याणकर, डॉ. गणेशराव अंभोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक, सामाजिक व संशोधन कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

डॉ. प्रकाश अंभोरे यांच्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे हिंगोली जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कार्यातून प्रेरणेचा नवा आदर्श निर्माण झाला आहे.

Related to this topic: