Breaking News
  • सलग दुसऱ्या दिवशी शिंदखेडा शहरासह जिल्हात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी
  • पुण्यात कोयत्याची दहशत कायम, हातात कोयता आणि बंदूक घेऊन तरुणाने पसरवली दहशत
  • अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय
  • अकोला जिल्ह्यातील पातुर नगरपालिकेवर काँग्रेस- शिवसेना उबाठा आघाडीचे वर्चस्व
  • गडचिरोली नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत 264 मतांनी भाजपचे अंकुश नैताम विजयी
  • भरत गोगावले पालक मंत्री होणार यात शंका नाही - आमदार महेंद्र थोरवे
  • रायगड जिल्ह्यातील स्विमिंग पूल 30 जून पर्यंत बंद ठेवण्यासंबंधी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जारी केले आहेत.
  • गडचिरोलीत 5 परीक्षा केंद्रांवर नीट-यूजीची फेरपरीक्षा सुरू
  • पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

डॉ. संतोष टारफे

डॉ. संतोष टारफे यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित

Dr. Santosh Tarfe:


डॉ संतोष टारफे यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित 

Dr. Santosh Tarfe |

 

एकनाथ शिंदे यांची मुंबईत घेतली भेट

हिंगोली (Dr. Santosh Tarfe) : माजी आमदार तथा शिवसेना उबाठा चे नेते डॉक्टर संतोष टारफे हे लवकरच शिंदे गटात प्रवेश घेणार आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या उपस्थितीत गुरुवारी डॉक्टर टारफे (Dr. Santosh Tarfe) यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

बहुजन समाज पार्टीतून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करणाऱ्या डॉक्टर संतोष टारफे (Dr. Santosh Tarfe) यांनी 2014 च्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसला कडवी झुंज दिली होती. काँग्रेसचे दिवंगत नेते अँड. राजीव सातव यांच्याविरुद्ध पराभूत होऊन त्यांनी सातवांचेच नेतृत्व स्वीकारले. काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन त्यांनी 2019 ची विधानसभा लढविली या निवडणुकीत संतोष बांगर यांनी त्यांचा पराभव केला. दरम्यान राजीव सातवांच्या निधनानंतर टारफेनी काँग्रेस सोडून शिवसेना उबाठा मध्ये प्रवेश घेतला. 2024 च्या विधानसभेत ते शिवसेना उबाठा कडून लढले. संतोष बांगर यांनी पुन्हा त्यांचा पराभव केला. यानंतर काही महिने चाचपणी करून त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे.

गुरुवारी आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत डॉक्टर संतोष टारफे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत त्यांना पक्षात सन्मानाची वागणूक मिळेल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे समजते. या भेटीदरम्यान आमदार संतोष बांगर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राम कदम, कैलास साळुंखे दांडेगावकर, एस पी राठोड, धनाजी बेले, नंदकिशोर तोष्णीवाल, बापूराव घोंगडे आदी उपस्थित होते. माजी आमदार संतोष टार्फे यांच्यासोबत आदिवासी समाजा सहित इतर  समाजातील अनेक कार्यकर्ते कळमनुरी तालुक्यात होणाऱ्या कार्यक्रमात जाहीर प्रवेश घेणार आहेत.

शिवसेनेला जमले बेरजेचे गणित

डॉक्टर संतोष टारफे (Dr. Santosh Tarfe) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्यातील आदिवासी समाजाचे मार्गदर्शक माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे जावई आहेत. राज्यभर सक्रिय असलेल्या आदिवासी युवक कल्याण समितीचे ते अध्यक्षही होते. मराठवाडा व विदर्भातील आदिवासी समाजातील युवकांवर त्यांचा चांगला प्रभाव असल्याने शिवसेनेला बेरजेचे गणित जमल्याचे बोलले जात आहे.

कळमनुरी विधानसभेत संतोष टारफे (Dr. Santosh Tarfe) यांना मिळालेली मते सन २०१४ मध्ये ६७१०४ मते मिळाली. सन २०१९ मध्ये ५७५४४ मते मिळाली तर सन २०२४ - ९०९९३ एवढी मते मिळाली होती. तीन निवडणुकीपैकी शेवटच्या निवडणुकीत डॉक्टर संतोष तर्फे यांचे मताधिक्य वाढले होते तरी देखील त्यांना आमदार संतोष बांगर यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले.

Related to this topic: