Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > पुणे

हत्या आणि आत्महत्त्या...वादाचे रूपांतर रक्तरंजित घटनेत!

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील निडी गावात घडलेल्या एका गंभीर घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.


हत्या आणि आत्महत्त्यावादाचे रूपांतर रक्तरंजित घटनेत

Double Death Case |

रायगड (Double Death Case) : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील निडी गावात घडलेल्या एका गंभीर घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. 20 वर्षीय तरुणीचा जीव घेतल्यानंतर आरोपी तरुणानेही आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणाचा तपास रोहा पोलीस करत आहेत. घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तन्वी गणेश ताडकर (वय 20, रा. निडी, ता. रोहा) आणि रोहित जनार्दन पाटील (वय 27, रा. निडी) हे सोमवारी रात्री निडी येथील लक्ष्मण दुर्गाजी गडेकर यांच्या घरात उपस्थित होते. रात्री सुमारे 8.15 वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाल्याचे सांगितले जात आहे.

या वादाचे रूपांतर गंभीर घटनेत झाले. प्राथमिक तपासानुसार, रोहित पाटील याने तन्वी ताडकर हिला मारहाण करून नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळा आवळला. या प्रकारात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने त्याच घरातील हॉलमध्ये पंख्याला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर निडी गावात एकच खळबळ उडाली. संबंधित घराचे मालक लक्ष्मण गडेकर यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांचा मुलगा नोकरीनिमित्त परदेशात वास्तव्यास असून कुटुंबातील इतर सदस्य ठाणे येथे राहतात. घराची देखभाल तन्वी ताडकर यांच्या आईकडे सोपविण्यात आली होती आणि घराची चावीही त्यांच्याकडे असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त कार्यभार असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेरेकर आणि रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा आणि पुढील तपासाची प्रक्रिया सुरू केली.

या प्रकरणी नामदेव मनोहर मढवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 175/2026 नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.

Related to this topic: