Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

Disability Pension

संजय गांधी निराधार, श्रावण बाळ व दिव्यांग अनुदानाच्या प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करा; शिवसेना (उबाठा)ची मागणी

शिवसेना (उबाठा)ला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


संजय गांधी निराधार श्रावण बाळ व दिव्यांग अनुदानाच्या प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करा शिवसेना उबाठाची मागणी

Disability Pension |

तीन महिन्यांपासून अनुदान रखडल्याचा आरोप; उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांना निवेदन, अन्यथा आंदोलनाचा इशारा

मलकापूर : गेल्या तीन महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना आणि दिव्यांग अनुदान योजनांतील मंजुरीच्या प्रकरणांचा निपटारा प्रलंबित असल्याने लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याचा आरोप करत शिवसेना (उबाठा)च्या वतीने उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांतील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना तसेच दिव्यांग अनुदान योजनांच्या प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करून पात्र लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण करण्यात यावे.

अन्यथा शिवसेना (उबाठा)ला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शिवसेना शहरप्रमुख हरीदास गणबास, युवासेना शहरप्रमुख मंगेश सातव, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, विभाग प्रमुख चाँद चव्हाण, विभाग प्रमुख सत्तार शाह, रफिकभाई पजायेवाले, शाम थोरबोले, गजानन उंबरकर, हरीदास शिंदे, आकाश मोरे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related to this topic: