Digras unseasonal rain: डिग्रस कर्हाळे येथे सोमवारी अवकाळी पावसाने वीजपुरवठा खंडित झाला. सिद्धेश्वर जलशुद्धीकरण केंद्राच्या 33 केव्ही विद्युत वाहिनीवर फॉल्ट झाल्याने वीजपुरवठा बंद
हिंगोली (Digras unseasonal rain) : डिग्रस कर्हाळे व परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस, विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सिद्धेश्वर जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. जोरदार वाऱ्यामुळे 33 केव्ही क्षमतेच्या मुख्य विद्युत वाहिनीवर फॉल्ट निर्माण झाला असून त्याचा थेट परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, 33 केव्ही वाहिनीवर फॉल्ट येताच 220 केव्ही उपकेंद्रातून पुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंत्यांनी दोन वेळा ट्रायल घेतली. मात्र दोन्ही वेळेस ‘हँड टू हँड ट्रिपिंग’ झाल्याने वीजपुरवठा पूर्ववत होऊ शकला नाही.
दिग्रस शहर व परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस, विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सिद्धेश्वर जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. (Digras unseasonal rain) जोरदार वाऱ्यामुळे 33 केव्ही क्षमतेच्या मुख्य विद्युत वाहिनीवर फॉल्ट निर्माण झाला असून त्याचा थेट परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, 33 केव्ही वाहिनीवर फॉल्ट येताच 220 केव्ही उपकेंद्रातून पुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंत्यांनी दोन वेळा ट्रायल घेतली. मात्र दोन्ही वेळेस ‘हँड टू हँड ट्रिपिंग’ झाल्याने वीजपुरवठा पूर्ववत होऊ शकला नाही. सध्या सिद्धेश्वर जलशुद्धीकरण केंद्रासह डिग्रस कर्हाळे या (Digras unseasonal rain) भागातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा बंद आहे. वीज खंडित झाल्याने जलशुद्धीकरण केंद्रातील पंप बंद पडले असून शहराचा पाणीपुरवठा तात्पुरता थांबवावा लागला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून 33 केव्ही वाहिनीवरील फॉल्ट शोधून तो दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. पाऊस व वाऱ्यामुळे पेट्रोलिंग करून बिघाडाचे नेमके ठिकाण शोधण्यात अडचणी येत आहेत. तरीही कर्मचारी परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर तात्काळ जलशुद्धीकरण केंद्राचे पंप सुरू करून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल. तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अवकाळी संकटामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीतून लवकरच मार्ग निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. डिग्रस कर्हाळे या भागातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा बंद आहे. वीज खंडित झाल्याने जलशुद्धीकरण केंद्रातील पंप बंद पडले असून शहराचा पाणीपुरवठा तात्पुरता थांबवावा लागला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून 33 केव्ही वाहिनीवरील फॉल्ट शोधून तो दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. पाऊस व वाऱ्यामुळे पेट्रोलिंग करून बिघाडाचे नेमके ठिकाण शोधण्यात अडचणी येत आहेत. तरीही कर्मचारी परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर तात्काळ जलशुद्धीकरण केंद्राचे पंप सुरू करून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल. तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अवकाळी संकटामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीतून लवकरच मार्ग निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.