Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

पातुर कडकडीत बंद

दिल्लीतील लाठीमाराच्या निषेधार्थ पातुर शहरात कडकडीत बंद; व्यापार्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Patur Shut Down: वंचित बहुजन आघाडी, शिवसेना आणि विविध संगठनांचे आग्रहपूर्ण निषेधास्पर्धा पातूर शहरातील दुकाने व व्यापारपेक्षा बंद करण्यात आली.


दिल्लीतील लाठीमाराच्या निषेधार्थ पातुर शहरात कडकडीत बंद व्यापार्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Patur Shut Down |

 

वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (उबाठा) व विविध संघटनांच्या आवाहनाला यश
जुने स्टँड, संभाजी चौकातील बाजारपेठ पूर्णपणे ठप्प

पातूर (Patur Shut Down) : दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ आज गुरुवारी वंचित बहुजन आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या ‘पातुर शहर बंद’ला व्यापाऱ्यांचा व नागरिकांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दिल्लीतील घटनेच्या निषेधार्थ (Patur Shut Down) आज पातुर शहरातील मुख्य बाजारपेठ, जुने स्टँड परिसर, छत्रपती संभाजी महाराज चौक, टी.के.व्ही. (TKV) चौक परिसरातील सर्व दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठान व बाजारपेठ पूर्णपणे बंद होती. व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपली प्रतिष्ठान बंद ठेवून या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला. अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आणि विविध स्थानिक संघटनांच्या पाठिंब्याने आयोजित या बंद आंदोलनात पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"विद्यार्थ्यांवरील हल्ला हा लोकशाहीवर झालेला थेट आघात असून, या अन्यायाविरोधात संपूर्ण पातुर शहर एकमुखाने उभे राहिले आहे," अशी प्रतिक्रिया या प्रसंगी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केली. दिवसभरात पातुर शहरातील महत्त्वाच्या सर्वच भागांत शुकशुकाट पाहायला मिळाला असून, कडकडीत बंद पाळून पातुरकरांनी दिल्लीतील लाठीमार घटनेचा तीव्र निषेध नोंदवला.